रमजानुल मुबारक भाग -४

By : Polticalface Team ,27-03-2023

रमजानुल मुबारक भाग -४
रमजानुल मुबारक भाग -४
कुरआन समजून घेताना ...
✒️सलीमखान पठाण
लेखक श्रीरामपूर
9226408082
दिनांक 27 मार्च : पवित्र रमजान महिन्यांमध्ये इस्लामी धार्मिक ग्रंथ कुरआन शरीफ चे अवतरण पृथ्वीतलावर झालेले आहे.सुमारे साडे तेवीस वर्ष कालावधी त्यासाठी लागला.प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहू अलैही व सल्लम यांचेवर अल्लाहचे विशेष देवदूत (फरिश्ता) हजरत जिब्रईल अलैसलाम हे अल्लाहचा संदेश घेऊन येत असत.मक्का शहराजवळील गार ए हिरा या गुहेमध्ये हजरत पैगंबर प्रार्थना करीत असतांना तेथे हे देवदूत येऊन त्यांना कुरआन मधील आयत वाचून दाखवित होते. हजरत पैगंबर ती पाठ करून घेत व आपल्या अनुयायांना सांगून तिचे लेखन करून ठेवीत होते.अशा पद्धतीने साडे तेवीस वर्षांमध्ये तीस खंडांचा हा दैवी ग्रंथ पृथ्वीतलावर अवतरीत झाला. हा दैवी ग्रंथ समस्त मानव जातीसाठी आहे. रमजान महिन्यांमधील विशेष प्रार्थनेचा भाग म्हणून घराघरातून खूप मोठ्या प्रमाणात महिनाभर कुरआन शरीफचे वाचन केले जाते.त्याचा अर्थ समजून घेतला जातो. अल्लाहतआला ला जो संदेश त्यातून अभिप्रेत आहे तो समजावून सांगण्याचे कार्य कुरआनशरीफचे जानकार करतात. कुरआन शरीफ म्हणजे दैनंदिन जीवनाची दैवी घटना आहे.घटनेमध्ये ज्या पद्धतीने नियम,अटी असतात. त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आपण जीवन व्यतीत केले पाहिजे,त्या प्रत्येक बाबीचे सखोल मार्गदर्शन कुरआन शरीफ मध्ये केलेले आहे. कोणते वाईट कृत्य केल्याने त्याचे काय परिणाम होतात हे सुद्धा त्यात नमूद केले आहे. प्रत्येकाने आपले जीवन सचोटीने जगावे,वागावे, बोलावे आणि चालावे ही शिकवण कुरआन शरीफ मध्ये दिलेली आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये कशा पद्धतीने आपण वर्तन केले पाहिजे या बाबी त्यात सांगितलेल्या आहेत. नातेवाईक, कुटुंब, मित्रपरिवार या प्रत्येकाचे कोण कोणते अधिकार आपल्यावर आहेत,आपले कर्तव्य त्यांच्या प्रति काय आहेत या बाबी देखील नमूद केल्या आहेत.आपले जीवन समृद्ध आणि सार्थक होण्यासाठी प्रत्येक माणसाने कशा पद्धतीने वागले पाहिजे याचे ही मार्गदर्शन या दैवी ग्रंथामध्ये केलेले आहे.ज्याने कुरआन शरीफ मधील शिकवण अंगीकारली त्याचे जीवन कारणी लागले असे समजले जाते.आपल्या प्रत्येक कृत्याचा हिशोब कयामतच्या दिवशी प्रत्येकाला द्यावयाचा असल्याने प्रत्येकाने पापभिरू वृत्तीने वागले व जगले पाहिजे हा मूलतः संदेश कुरआनमध्ये दिलेला आहे.चांगले जीवन जगण्यासाठी कुरआनचा संदेश समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे.(क्रमशः) *********************

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.