शिवाजीराव नागवडे विद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

By : Polticalface Team ,27-03-2023

शिवाजीराव नागवडे विद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न श्रीगोंदा तालुक्यातील श्री शिवाजीराव नागवडे विद्यालयामध्ये एसएससी बॅच 2006 च्या माजी विद्यार्थ्यांचा सस्नेह मेळावा रविवार दिनांक 26 मार्च 2023 रोजी ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक श्री लगड बी के सर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. या मेळाव्यास 2006 साली शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी दहा वाजता एकत्र येऊन विद्यालयामध्ये एकमेकांशी संवाद साधला, यामध्ये प्रामुख्याने ए पीआय प्रियंका गोरे व एक्झिक्युटिव्ह रोहिणी भुजबळ यामाजी विद्यार्थिनींसह अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी त्यांना शिकविणारे सर्व शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री शिर्के बी एस सर हे त्यांच्या सर्व सेवकांसह उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी सर्वांना एकत्र आणून एक आनंददायी अशा प्रकारचा स्नेहमेळावा आयोजित केला व त्या मेळाव्यामध्ये प्रत्येकाने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर काही माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपण कार्यरत आसलेल्या विविध क्षेत्रांमध्ये कोणी आयटी क्षेत्रात, कोणी सरकारी नोकरीमध्ये, तर कोणी उद्योगधंद्यां मध्ये आणि काही विद्यार्थी उत्तम प्रकारची शेती करत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यालयामध्ये झालेला बदल व निसर्ग रम्य वातावरण पाहून सर्व माजी विद्यार्थी भारावून गेले. सासरी असलेल्या मुलींनाही माहेरी आल्यानंतर एक सुखद अनुभव आज विद्यालयामध्ये आला. असे माजी विद्यार्थ्यांनी मनोगतामध्ये सांगितले. तसेच आम्ही प्रत्येक जण कशा पद्धतीने घडलो व शिक्षकांनी आम्हाला त्याकाळी कशा पद्धतीने मार्गदर्शन केले, शिकविले . याप्रसंगी शालेय जीवनातील एकमेकांच्या जुन्या आठवणी विद्यार्थ्यांनी अतिशय मनोरंजक पद्धतीने सांगितल्या. शिक्षकांनी देखील त्याकाळच्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या व हे सर्व विद्यार्थी उच्च पदावर पोहोचण्याचा शिक्षकांना देखील मनोमन आनंद झाला तो त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये व्यक्त केला. शाळेचे बदललेलं रूप पाहून विद्यार्थी देखील भारावून गेले. याप्रसंगी त्यावेळीचे मुख्याध्यापक व सध्याचे संस्थेचे निरीक्षक श्री बी के लगड सर यांनी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे तथा आदरणीय बापू यांनी जुने 1988 साली स्थापन केलेल्या विद्यालयाच्या प्रगती बाबतचा लेखाजोखा माजी विद्यार्थ्यांसमोर मांडला. व माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या ऋणातून उत्तराई होण्याच्या दृष्टीने विद्यालयाच्या स्टेजवर सुसज्ज अशा प्रकारचे मंडप करून देण्याचे आश्वासन दिले. या माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करण्याचे महत्त्वाचे काम श्री सुधीर नागवडे व विशाल नागवडे या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या सर्व मित्रांना प्रेरित करून एकत्रित केले. व हा मेळावा पार पाडण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. या वेळी उपस्थित शिक्षक अहमदनगर जिल्हा शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष श्री आप्पासाहेब जगताप तसेच श्रीगोंदा तालुका शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष श्री हनुमंत रायकर श्री बी जी भिसे व त्या वेळचे वर्गशिक्षक श्री गायकवाड आर आर तसेच मुख्याध्यापक काळे डी के व पाहुणे म्हणून ए पीआय श्री शेंडगे साहेब यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.