By : Polticalface Team ,28-03-2023
                           
                रमजानुल मुबारक - ५  
*मानवी प्रशिक्षणाचा काळ*
*✒️सलीमखान पठाण*
               श्रीरामपूर
      
     ९२२६४०८०८२
रमजान महिना ही जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक पर्वणी आहे. व्यक्तीच्या प्रशिक्षणाचा हा काळ आहे. दैनंदिन जीवनामध्ये वावरतांना अनेक प्रसंगांना  आपल्याला सामोरे जावे लागते.त्यांना सामोरे जाताना आपण कशा पद्धतीने वागले पाहिजे याचे प्रशिक्षण रोजाच्या माध्यमातून रमजान महिन्यात होत असते. यासाठी केवळ उपाशी राहून चालत नाही. तर प्रत्यक्ष कृतीची गरज असते आणि महिनाभर झालेली ही कृती पुढे वर्षभर जर आपल्या जीवनात टिकली तर आपण जिंकलो.
रोजा असो अगर नसो, प्रत्येक माणसाने बोलताना आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अश्लील बोलणे, शिव्या शाप देणे, खोटं बोलणे या कृतीमुळे व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो.रोजामुळे आपण कसे वागावे याची एक सीमारेषा आखली जाते. विनाकारण कुणाशी वाद घालू नये, कुणाची निंदा करू नये, शिव्याशाप देऊ नये, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावेल असं कोणतंही वक्तव्य आपण करू नये ही सर्व शिकवण रोज्यातून मिळत असते.
दैनंदिन जीवनामध्ये व्यक्तीने कसे वागावे याची एक आचारसंहिता इस्लाम धर्माने कुरआनच्या माध्यमातून घालून दिलेली आहे. प्रत्येकाने त्या पद्धतीनेच वागले पाहिजे. व्यवहारांमध्ये सचोटी असावी. वागण्यामध्ये नम्रता असावी. कुणाची ही पाठीमागे निंदा करू नये याला गिबत म्हणतात. हा सर्वात मोठा रोग प्रत्येकाला लागलेला आहे. एखाद्याचं चुकलं असेल तर समोरासमोर त्याला सांगणे कधी ही चांगलं. परंतु पाठीमागे दुसऱ्याजवळ त्याच्याबद्दल निंदात्मक बोलणे हे मान्य नाही. कोणी जर आपल्याशी विनाकारण भांडत असेल तर त्याच्या तोंडी  न लागता भाऊ मला रोजा आहे असे सांगून शांत राहावे.
आपला रोजचा वेळ ईश्वर भक्तीसाठी समर्पित करावा. ईश्वराचे म्हणजे अल्लाहचे नामस्मरण करावे. कुरआन पठण करावे. दानधर्म करावा. आपल्या घरामध्ये चांगले खात असताना आपला शेजारी भुकेला आहे किंवा कसे याची दक्षता घेण्याची शिकवण सुद्धा हजरत पैगंबरांनी दिली आहे.
रमजान महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या संस्कारांचे मोठे पुण्य आहे. हा पुण्यसंचय करण्यासाठी प्रत्येकाने अल्लाहतआला ने निश्चित केलेल्या मार्गानुसार व हजरत पैगंबरांनी दिलेल्या संदेशानुसार आपले जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न केला तर जीवनातून सर्व प्रकारच्या चुकीच्या चालीरीती,वाईट प्रथा नष्ट होऊन एक सार्थ आणि परमार्थ जीवन जगता येईल. आपल्यामुळे इतरांना दुःख होईल किंवा यातना होतील असं वर्तन कुणीही करू नये.याचे प्रत्यक्ष आचरण रमजान महिन्याच्या माध्यमातून केले जाते.ते अंगिकारून प्रत्येकाने आपले जीवन सफल करण्याचा प्रयत्न केल्यास यथार्थ जीवन जगल्याचे समाधान आपल्याला प्राप्त होऊ शकते. यासाठी मनाचा निश्चय करून आपण आपले दैनंदिन वर्तन केले पाहिजे. स्त्री आणि पुरुष दोघांना या सर्व बाबी लागू आहेत.(क्रमशः)
*********************
              
              
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष