आ.संजयमामा शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्याचे फलित... वंचित गावासाठी जिल्हा नियोजन मंडळामधून 5 कोटी 53 लाखाची तरतूद ...
By : Polticalface Team ,28-03-2023
करमाळा प्रतिनिधी
करमाळा - माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी 8 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये करमाळा - माढा मतदारसंघातील 152 गावातील वाडी वस्त्यांचा गाव भेट दौरा केला होता .या गाव भेट दौऱ्यामध्ये गावातील तसेच वाडी वस्तीवरील अडचणी समजून घेत असताना प्रत्येक गावातील शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी ,रस्ते ,व्यायाम शाळा , अल्पसंख्यांक मुस्लिम समाज , दलित वस्त्या यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्याच्या नोंदी केल्या गेल्या. या माहितीचे दृश्य परिणाम म्हणून 20 22 - 23 च्या जिल्हा नियोजन मंडळामधून करमाळा तालुक्यासाठी तब्बल 5 कोटी 53 लाखाची तरतूद करताना तालुक्यातील वंचित गावांना व दुर्लक्षित वाडीवस्तीवरील कामांना प्राधान्य देण्यात आले.
जिल्हा नियोजन मंडळामधून रावगाव, शेलगाव क ,मिरगव्हाण, व कविटगाव या गावांमध्ये बंदिस्त व्यायाम साहित्य साठी प्रत्येकी 5 लाख रुपये ,लव्हे आणि भाळवणी या 2 गावासाठी खुले व्यायाम साहित्य साठी 10 लाख, समाज कल्याण विभागाअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या शीर्षकांतर्गत तालुक्यातील तब्बल 81 ग्रामपंचायत साठी 3 कोटी 10 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली या निधीमधून काँक्रीट, रस्ता, बंदिस्त गटार, पेविंग ब्लॉक आदी कामे केली जाणार आहेत .
30 54 हेड अंतर्गत तालुक्यातील कुंभारगाव ते घरतवाडी, कुस्करवाडी ते इजीमा रस्ता ग्रामा 18, रावगाव दगडवाडी ते शेळके वस्ती वाघमारे वस्ती रस्ता अशा 5 रस्त्यांसाठी 50 लाख रुपये, अल्पसंख्यांक विभाग अंतर्गत मुस्लिम कब्रस्तानांच्या संरक्षण भिंत बांधणे, अंतर्गत रस्ता यासाठी वडगाव उत्तर ,उमरड, कंदर, जातेगाव, रावगाव येथे प्रत्येकी 7 लाख याप्रमाणे 35 लाख निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत तालुक्यातील वीट, जिंती ,कोळगाव, पांगरे, जेऊर ,दहिगाव ,हिंगणी या गावांसाठी 60 लाख असा विकास निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
जिल्हा नियोजन मंडळाच्या सदर मंजूर निधी मधून वाडी वस्तीवरील निकडीचे व दुर्लक्षित अशी कामे होण्यास मदत होणार आहे .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.