By : Polticalface Team ,28-03-2023
                           
                लिंपणगाव (प्रतिनिधी)-- सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांची अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राज्याचे माजी महसूल मंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते नामदार बाळासाहेब थोरात यांचे शुभहस्ते शुक्रवारी 31 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता सत्कार आयोजित करण्यात आला असल्याची माहिती तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रा. धर्मनाथ काकडे यांनी दिली.
 प्रसिद्धी पत्रकात प्रा. काकडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांची नुकतीच अहमदनगर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड झाली असून को-जन असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झालेली आहे. त्यानिमित्त नागवडे यांचा सत्कार शुक्रवार ता. 31 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रगती मंगल कार्यालय ढोकराई येथे राज्याचे माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते नामदार बाळासाहेब थोरात यांचे शुभहस्ते आयोजित करण्यात आलेला आहे.
या सत्कार समारंभासाठी पुणे कसबा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित आमदार रमेश धंगेकर, श्रीरामपूरचे आमदार लहुजी कानडे, पुण्याचे माजी आमदार व ज्येष्ठ नेते मोहन जोशी, काँग्रेस पक्षाचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेवराव वाफारे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. अनुराधा नागवडे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, जिल्हा बँकेचे माजी संचालक संपतराव म्हस्के, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल भैया वाबळे, यांच्यासह नगर जिल्हा काँग्रेस कार्यकारीनीचे व सर्व फ्रंटल चे पदाधिकारी महिला व युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच जिल्हा व तालुक्यातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या या सत्कार समारंभास तालुक्यातील सर्व पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते व नागवडे प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष प्रा. धर्मनाथ काकडे यांनी केले आहे. वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष