राज्यस्तरीय चॅम्पियनशिप तायकांदो स्पर्धेमध्ये वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश
By : Polticalface Team ,29-03-2023
अमोल गायकवाड- वडगाव निंबाळकर
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी शिरवळ या ठिकाणी राज्यस्तरीय चॅम्पियनशिपतायकनदो झालेल्या स्पर्धेमध्ये वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. या स्पर्धेमध्ये विराज गाडेकर याला गोल्ड मेडल, श्रुती साळवे सिल्वर मेडल,आहिल सय्यद याला सिल्वर मेडल मिळाले असून यशस्वी विद्यार्थ्यांचे वडगाव निंबाळकर व परिसरातील ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले आहे. या यशाबद्दल रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष कांचन काटे प्राचार्य श्रद्धा मस्कर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.या उत्तुंग यशाबद्दल वडगाव निंबाळकर व परिसरातील ग्रामस्थांकडून शुभेच्छां व्यक्त होतआहे.
वाचक क्रमांक :