नाईक सुभेदार ज्ञानेश्वर बागल यांचे दुख:द निधन उद्या होणार त्यांच्या मूळ गावी झरे येथे शासकीय इतमानाने अंत्यसंस्कार
By : Polticalface Team ,31-03-2023
जेऊर प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे सुपूत्र झरे गावचे रहिवासी नाईक सुभेदार ज्ञानेश्वर बापुराव बागल यांचे ३९ व्या वर्षी ग्वालियर झांसी येथे दुखःद निधन झाले आहे आज सकाळी त्यांच्या निधनाचे वृत समजताच झरे गावावर दु:खाची छाया पसरली आहे त्यांचे अंतिम संस्कार उद्या शुक्रवारी झरे येथे शासकीय इतमामात होणार आहे
नाईक सुभेदार ज्ञानेश्वर बागल हे २००३साली भारतीय सेनेत भरती झाले होते ते ग्वालियर ८ या ठिकाणी सेवेत असताना त्यांचे दुख:द झाले
नाईक सुभेदार ज्ञानेश्वर बागल यांचा जन्म १९८४ साली झाला असुन त्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण झरे गावात झाले असुन महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले त्यानंतर २००३ साली ते भारतीय सेनेत भरती झाले त्यांना पुढे पदोन्नती मिळून ते नाईक सुभेदार झाले गायन सम्राट बापुराव बागल यांचे ते चिंरजिव होत त्यांच्या पश्चात आईं वडील पत्नी मुले भाऊ असा परिवार आहे झरे तालुका करमाळा येथे ग्रामस्थांनी त्यांच्या दुखद निधनाची वार्ता ऐकून त्यांना ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली
वाचक क्रमांक :