By : Polticalface Team ,31-03-2023
                           
              जेऊर प्रतिनिधी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षणक्षेत्रातील योगदान ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणारे आहे असे मत पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केले. जेऊर ता करमाळा येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जेऊर ता करमाळा येथील भारत हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या व्यावसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख प्रा अर्जून सरक यांच्या सेवानिवृत्तीचे औचित्य साधून तसेच भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचीवपदी निवड झाल्याबद्दल एका सेवापुर्ती ऋतज्ञता सोहळा व ग्रंथतुला समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा आ दत्तात्रय सावंत होते तर माजी आमदार नारायण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारंभाच्या निमित्ताने नामांकित विचारवंत व लेखक प्राचार्य डाॅ महेंद्र कदम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. "ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेपुढील आव्हाने व संधी" या विषयावर त्यांनी आपले मौलिक विचार मांडले. सेवापुर्ती निमित्ताने प्रा अर्जून सरक यांची ग्रंथतुला करण्यात आली. यावेळी बोलताना माजी आमदार सावंत यांनी प्राथमिक तसेच माध्यमिक  शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर असून नारायण पाटील यांच्याशी आपले ऋणानुबंध घट्ट व राजकारणापलिकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर भारत शैक्षणिक संकुलातील प्रत्येक घटक हा गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण शिक्षण देण्यासाठी मनापासून प्रयत्न करत असून त्याचे प्रतिबिंब दहावी व बारावीच्या तसेच विद्यापीठाच्या पदवी परिक्षेच्या निकालातुन उमटते. प्रा अर्जून सरक यांचेवर आता या संस्थेच्या कामकाजाची अतिरिक्त जबाबदारी आपण सोपवली असून आपल्या कृतीतून ते निश्चितच ही जबाबदारी समर्थपणे पेलतील असा विश्वास माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केला.यावेळी व्यासपीठावर माजी जि प सदस्य दिलीपदादा तळेकर, जि अध्यक्ष  अनिरुद्ध कांबळे, जि प सदस्या सौ सवितादेवी राजेभोसले,शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, नवनाथ झोळ, उपसभापती गणेश चौधरी, मा उपसभापती दत्ता सरडे, पं स सदस्य दत्ता जाधव, मा सभापती शेखर गाडे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जयप्रकाश बिले, महेंद्र पाटील, प्राचार्य मच्छिंद्र नुस्ते,रश समाजसेवक गणेश करे-पाटील, संस्था उपाध्यक्ष राजूशेठ गादीया, संस्था संचालक संपतलाल राठोड, राजन पाटील, संदिप कोठारी, विकास पाथ्रुडकर, प्राचार्य डाॅ अनंत शिंगाडे, प्राचार्य केशव दहिभाते, मुख्याध्यापक दिपक व्यवहारे, माजी प्राचार्य प्र गो मेहता, गोडसे सर, मरळ सर, ठोकळ सर, अनभुले सर, शेंडे काका, घाडगे भाऊसाहेब आदि उपस्थित होते.यावेळी यशकल्याणी संस्थेच्या वतीने गणेश करे-पाटील यांनी प्रा अर्जून सरक यांचा मानपत्र देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले.तर आभार प्राचार्य केशव दहिभाते सर यांनी मानले. सूत्रसंचालन अंगद पठाडे यांनी केले.विद्या विकास मंडळाचे सचीव विलासराव घुमरे यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी सोलापूर जिल्हा परिषद, करमाळा पंचायत समिती, भारत शैक्षणिक संकुल, नारायण (आबा) पाटील पतसंस्था, ग्रामपंचायत जेऊर, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर, भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ यासह अनेक संस्था यांचे वतीने प्रा अर्जून सरक यांचा सत्कार करण्यात आला.
              
              
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष