महाविकास आघाडीचा झेंडा फडकवडण्या साठी सर्वानी एकजुटीने काम करावे: - घनश्याम शेलार.
By : Polticalface Team ,01-04-2023
अहमदनगर चिंचोडी पाटील प्रतिनिधी:-
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या परिवर्तन संवाद यात्रा आज चिंचोडी पाटील येथे शिवसेना जिल्हा अध्यक्ष शशीकांत गाडे सर यांचे उपस्थिती मद्दे पार पडली. गाडे सर म्हटले की मुबंईला महाविकास आघाडी ची बैठक होऊन सर्व निवडणुका एकत्र लडण्याचा निर्णय झालेला आहे. त्या मुळे सर्व निवडणूका ताकदीने लडल्या जातील. शेलार यांचा जनसपंर्क दांडगा आहे. त्याना सर्व प्रश्न याची जाण आहे. मागील विधानसभा निवडणुकीत संधी थोडक्यात हुकली. शेलार म्हणाले की. परिसंवाद यात्रेला प्रतिसाद चांगला आहे लोक कितीही उशीर झाला तरी थांबून राहत आहेत. याचा अर्थ माझ्यावर असलेला तुमचा विश्वास. सद्या माझे कडे देण्यासाठी काही नाही. तरी तुम्ही माझेवर प्रेम करता. हे माझे भाग्य आहे.आपण सर्वजण संवाद परिवर्तन यात्रा मद्दे सामील आहात यावरून येत्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन होऊन महाविकासआघाडीचा झेंडा पडकणार. त्या मुळे आपण असे सर्व निवडणुकीत एकजुटीने काम करावे. असे त्यानी सांगितले. या परिवर्तन यात्रेला सभेला प्रवीण कोकाटे, मीनल भिंताडे,शरद पवार, प्रकाश मोटे, जयश्री कोकाटे, माई शेलार,इत्तर महिला मान्यवर. गावातील लोक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :