मजुराला कामावर उशिरा का आला असे विचारल्याचा राग आल्याने मजुराने कारखाना मालक यांच्या आईवर चाकूने केला हल्ला.

By : Polticalface Team ,01-04-2023

मजुराला कामावर उशिरा का आला असे विचारल्याचा राग आल्याने मजुराने कारखाना मालक यांच्या आईवर चाकूने केला हल्ला.
श्रीगोंदा प्रतिनिधि:- श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील गणपती कारखान्यात कामाला असलेल्या मजुराला कामावर उशिरा का आला असे विचारल्याचा राग आल्याने या मजुराने कारखाना मालक खंडू चंदन यांच्या आईवर चाकूने हल्ला करून जखमी करत पळून जाणाऱ्या मजुराला दोन तरुणांनी पाठलाग करून पकडत पोलिसांच्या हवाली केले.

मयूर संजय भागवत रा.शिवाजीनगर अहमदनगर असे ताब्यात दिलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात वृद्धावर चाकूने हल्ला करत जखमी केल्या प्रकरणी खंडू काशीनाथ चंदन यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी भेट देऊन पाहणी करत पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांना तपासाबाबत सूचना केल्या. या बाबत कोळगाव येथील गणपती कारखानदार खंडू काशीनाथ चंदन यांनी बेलवंडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी यांच्या गणपती कारखान्यातील सुट्टीला गेलेला कारागीर ३० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास माघारी आला. त्यावेळी फिर्यादी यांची आई ताराबाई यांनी त्याला कामावर काल येणार होता, कामावर येण्यास उशीर का झाला ? असे विचारल्याने दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. या वादात त्याने ताराबाई यांना तुम्हाला बघुन घेईन असे म्हणत धमकी दिली. यावेळी फिर्यादी यांनी दोघांचा वाद मिटवत दोघांना शांत केले.

रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सर्व जण जेवण करून झोपयला गेले असता साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी याने ताराबाई यांच्या मानेवर आणि हातावर चाकूने गंभीर जखमी केले. मात्र यावेळी जखमी वृद्ध महिलेने जोरात आरडा ओरडा केल्याने कुटुंबातील सर्वजण काय झाले हे पाहण्यासाठी गेले असता वृद्ध महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असल्याचे दिसून आले व तेथे आरोपी मयूर भागवत हा हातात चाकू घेऊन उभा असल्याचे दिसून आला. घरातील सर्वजण आल्याचे पाहून आरोपीने चाकू तेथेच टाकून तेथून पळ काढला असता त्यावेळी फिर्यदीचा चुलत भाउ आकाश चंदन व शेजारी राहणारे गौरव पुरी यांनी आरोपीचा पाठलाग करत पकडून पोलिसांच्या हवाली केले. जखमी वृद्धेला नातेवाईकांनी नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करीत दाखल केले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे हे करत आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी