रमजानुल मुबारक - भाग 9: कुरआन आणि रमजान
By : Polticalface Team ,01-04-2023
रमजानुल मुबारक - ९
कुरआन आणि रमजान
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
९२२६४०८०८२
पवित्र रमजान महिन्यातील महत्त्वाची घटना म्हणजे कुरआनशरीफचे पृथ्वीतलावर झालेले अवतरण. अल्लाहतआला,जो समस्त ब्रह्मiड चा रब आहे.जो निसर्ग,पृथ्वी, वातावरण या सर्वांचा मालिक आहे.ज्याला रब्बुल आलमिन म्हटले जाते.तो सर्वांचा आहे. फक्त मुस्लिमांचा नाही. केवळ मुस्लिमांचा असता तर त्याला रब्बुल मुसलिमीन म्हटले गेले असते.परंतु कुरआनशरीफची जी पहिलीच आयत आहे. ज्याची सुरुवात सुरए- फातेहा मध्ये होते.त्यात म्हटले आहे अल्हमदुलिल्लाही रब्बील आलमीन.म्हणजे तो ईश्वर,जो संपूर्ण सृष्टीचा (आलम) रब आहे.
लोकांच्या मार्गदर्शनासाठी अल्लाहतआला ने कुरआन शरीफ हा ईश्वरी ग्रंथ आपला खास दूत फरिश्ता हजरत जीब्रईल मार्फत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यापर्यंत पोहोचवला. त्यांनी तो आपल्या अनुयायांमार्फत लोकांमध्ये आम (सार्वजनिक ) केला.अल्लाहने हा ग्रंथ फक्त मुस्लिमांसाठी नाही तर,या जगातील समस्त मानवजातीसाठी पाठविला आहे.म्हणून आज संपूर्ण जगभरामध्ये केवळ मुस्लिम नव्हे तर जगभरातील सर्व जाती, धर्म आणि पंथाचे लोक कुरआनशरीफ समजून घेत आहेत.जगातील सर्व भाषांमध्ये त्याचे भाषांतर झालेले आहे.जगातील अनेक विद्यापीठांमध्ये कुरआनशरीफ वर खास संशोधन आजही सुरू आहे.मराठी भाषेत देखील कुरआन उपलब्ध आहे .माझ्या अनेक मराठी मित्रांनी आत्तापर्यंत त्याचा लाभ घेतला आहे.ते कुरआन शरीफचे अध्ययन करतात आणि प्रश्नोत्तर रूपाने समजूनही घेतात. दोन वर्षापूर्वी अहमदनगर मध्ये झालेल्या ग्रंथप्रदर्शनात सर्वाधिक विक्री मराठी भाषेतील कुरआन शरीफ या ग्रंथाची झाली होती हे विशेष.
हा ईश्वरी ग्रंथ रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये पृथ्वीवर अवतरला. दरवर्षी रमजानमध्ये, जगामध्ये जसेजसे प्रसंग निर्माण होत,त्यानुसार अल्लाह कडून हजरत पैगंबरांना कुरआनच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळत असे. प्रेषित हजरत पैगंबरांना वयाच्या चाळीसाव्या वर्षी नबुवत (प्रेषित्व ) प्राप्त झाली.तद्नंतर लगेच कुरआनशरीफ चे अवतरण सुरू झाले . जवळपास तेवीस वर्षांच्या कालावधीमध्ये हा ग्रंथ हजरत पैगंबरांपर्यंत आला.त्यांनी तो लोकांपर्यंत पोहोचवला. प्रत्येक माणसाने आपले जीवन कशा प्रकारे व्यतीत करावे याचे सखोल मार्गदर्शन कुरआनशरीफ मध्ये अल्लाहतआलाने केले आहे.प्रत्येकाने काय करावे,काय करू नये, पुण्य कशामध्ये आहे, पाप कशामुळे होते,मोठ्यांशी कसे वागावे, छोटयांशी कसे वर्तन करावे,व्यवहारात पारदर्शकता कशी असावी अशा अनेक बाबी,ज्या आपल्या जीवनाशी संबंधित आहेत.त्याचे मार्गदर्शन कुरआनशरीफ मध्ये केलेले आहे.आज आपण कुरआनची शिकवण सोडून दिल्यामुळे संपूर्ण जगच संकटात सापडले आहे.यासाठीच कुरआनशरीफ समजून घेऊन त्याचा अंगीकार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करण्याची आवश्यकता आहे.(क्रमशः )
-----------------------------------
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी