By : Polticalface Team ,01-04-2023
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
अर्थ संकल्पनातून करमाळा मतदार संघासाठी भोपळा, आ. संजयमामा शिंदे यांच्या निष्क्रियतेमुळे विकास खुंटला असल्याचा घणाघाती आरोप पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला. महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नूकतेच संपले असून सोलापूर जिल्ह्यातील इतर मतदार संघातील आमदारांनी शंभर कोटींच्या आसपास मजल मारली परंतू करमाळा मतदार संघासाठी नाममात्र दहा बारा कोटींचा निधी मंजूर झाल्याने याचे पडसाद आता मतदार संघात उमटले जाऊ लागले आहेत. याबाबत सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार नारायण पाटील यांनी त्यांच्या 2014 ते 2019 या कालावधीत करमाळा मतदार संघातील विकासकामांसाठी राज्य व केंद्र यांच्या माध्यमातून 1300 कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला होता.राज्याच्या प्रत्येक अर्थसंकल्पात सहभागी होऊन त्यांनी निधी खेचून आणला. परंतू विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी 2019 नंतर आपल्या निष्क्रियपणामुळे व दुट्टपी भूमिकांमुळे करमाळा मतदार संघास विकासापासून पाच वर्षे मागे नेले आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात सोलापूर जिल्ह्यातील इतर आमदारांनी त्यांच्या मतदार संघातील प्रश्न सभागृहात मांडून निधी मंजूर करुन घेतला. सांगोला मतदार संघातील रस्ते विकासासाठी आ. शहाजीबापु पाटील यांनी 75 कोटी रुपये मंजूर करुन घेतले. दक्षिण सोलापूर मतदार संघातील 22 रस्त्यांच्या कामासाठी आ. सुभाष देशमुख यांनी 75 कोटी रुपये मंजूर करुन घेतले.बार्शी मतदार संघासाठी आ. राजेंद्र राऊत यांनी 161 कोटी रुपयांची तरतूद करुन घेतली. मोहोळ मतदार संघातील उपसा सिंचन योजनेसाठी आ. यशवंत माने यांनी 120 कोटी रुपयांची तरतूद करुन घेतली. माढा तालुक्यातील सीना-माढा सिंचन योजनेसाठी आ. बबनदादा शिंदे यांनी 130 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला. मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी गावांच्या शेतीचा प्रश्न अधिवेशनात मांडून आ. समाधान आवताडे यांनी निधीची मागणी केली. रस्ते विकासासाठी 75 कोटी रुपये मंजूर करुन घेतले. मग करमाळा मतदार संघातील विकासकामांसाठी विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी किती निधी मंजूर करुन घेतला याचा हिशेब व लेखाजोखा जनतेसमोर मांडला पाहीजे. विद्यमान आमदार महोदयांनी करमाळा मतदार संघातील दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी त्यांच्या कालावधीत एक रुपयाही मंजूर करुन आणला नाही. कुकडीबाबतही फक्त मोठ्या पोकळ घोषणा केल्या. रस्ते दुरुस्ती साठी तर आवाजच उठवला नाही. एम आय डी सी बाबतही सभागृहात तोंड उघडलं नाही. यामुळे आज मतदार संघाचा विकासगाडा एकाच जागी बसून आहे. आमदार महोदयांनी त्यांची कार्यपद्धती व क्षमता याचे प्रदर्शन केले असून त्यांच्या निष्क्रियतेचा फटका मतदार संघास बसला असून जनता आता याचा हिशेब मागणार आहे. माजी आमदार नारायण पाटील यांच्या 2014-2019 या कालावधी बरोबर विद्यमान आमदार महोदयांच्या 2019-2023 या आजवरच्या कालावधीतील कार्यपद्धतीचा फरक आता जनतेस ठळकपणे जाणवू लागला असल्याचेही तळेकर यांनी सांगितले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष