समाजकारण आणि धार्मिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तीमत्व- . ह भ प स्वर्गीय. ज्ञानदेवराव काका शिंदे

By : Polticalface Team ,02-04-2023

समाजकारण आणि धार्मिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तीमत्व- . ह भ प स्वर्गीय. ज्ञानदेवराव काका शिंदे आमचे मामा आणि संपूर्ण मढेवडगाव पंचक्रोशी काका या नावाने परिचीत असलेले मढेवडगाव सेवा सोसायटीचे माजी चेअरमन स्व. ह.भ.प.ज्ञानदेवराव (काका) रामभाऊ शिंदे यांचे प्रथम पुण्यस्मरण मागील बुधवार दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजीच्या ८१ व्या वर्षी त्यांचे देहावसान झाले. रामभाऊ देवजी शिंदे यांच्या पोटी जन्मलेले सहा बहिणी आणि सर्वात धाकटे ज्ञानदेव त्यांचे प्राथमिक शिक्षण मढेवडगाव येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढील माध्यमिक शिक्षण मोठ्या जिद्द व चिकाटीने पूर्ण करून शेती व्यवसायाकडे थोरले बंधू स्वर्गीय आनंदराव शिंदे (अण्णा )आणि मधवे बंधू गुलाबराव शिंदे या शिंदे कुटुंबात नवीन ट्रॅक्टर घेऊन अतिशय अभ्यासू व आधुनिक पद्धतीने संत्रा फळा लावून उत्पादनात वाढ तर केलीच. परंतु "झाडे लावा झाडे जगवा" हा संदेश त्यांनी ६० वर्षापूर्वी अमलात आणून उत्कृष्ठ शेती करत तालुक्यात आदर्श शेतकरी म्हणून आपली ओळख करून दिली. तारुण्यात ढोल लेझीम सारख्या मर्दानी खेळात त्यांचा हातखंडा होता. तासनतास ढोल वाजवणारा मर्द अशी त्यांची मढेवडगाव सह शेजारच्या आसपास गावात ओळख निर्माण झाली. काकांनी, कबड्डी- खो-खो खेळात काका हे सर्वांचे ढोल, लेझीम खेळाचे उत्कृष्ट मार्गदर्शक व गुरु होते. . माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांचे ते अतिशय जवळचे विश्वासू सहकारी होते. सन १९८० ते १९९५ पर्यंत त्यांनी आमदार पाचपुते यांना विधानसभेच्या प्रचार काळात काकांनी मोलाची साथ दिली. नंतरच्या काळात स्वगीय शिवाजीराव बापू नागवडे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. तेव्हापासून खऱ्या अर्थाने काकांची राजकिय कारकीर्द सुरु झाली. त्यामध्ये त्यांनी मढेवडगाव विविध सेवा कार्यकारी सोसायटीचे अध्यक्षपद भूषवत असताना त्या कालावधीत संस्थेची मढेवडगाव येथे भव्य अशी इमारत उभी करून गावात एक आगळा वेगळा ठसा निर्माण केला. काकांचे पुतणे श्री सुभाषराव काका शिंदे यांची कारखान्याच्या संचालकपदी वर्णी लावून त्यांच्या रूपाने स्व शिवाजीराव नागवडे बापू तसेच सहकारमही नागवडे कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्री. राजेंद्र दादा) नागवडे यांचे खांदे कार्यकते म्हणून त्यांनी मोलाची अशी साथ देत तालुक्याच्या राजकीय पटलावर विश्वासू कार्यकर्ता म्हणून परिचित होते. सहकारातील तसेच राजकरणातील काकांचे कार्य उत्तम व यशस्वी ठरले व जिव्हाळ्याचे संबंध जोपासले. .प्रेमाने वागणारे काका सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, यांना ते हवेहवेसे वाटायचे . प्रत्येकाच्या अडचणीमध्ये धावून जाऊन मदत करणे हा त्यांचा निस्वार्थ स्वभाव होता.आयुष्याच्या अखेरच्या पर्वात काकांनी आपले आयुष्य परमार्थात झोकून दिले. किर्तन, प्रवचन, ,हरिपाठ, अखंड हरिनाम, सप्ताह, पायी दिंडी सोहळा अग्रेसर असायचे. अन्नदान, वस्त्रदान, गोदान या तत्त्वांचा काकांनी अखेरपर्यंत अंगीकार केला, त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाने मासिका निमित्ताने वर्षभर भजन, कीर्तन तसेच, प्रवचन यासारखे विविध अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले . काकांनी धार्मिक उपक्रम राबवत असताना मढेवडगाव पंचक्रोशीतील भजनी मंडळाने व वांगदरी, मासाळवाडी, शेळकवस्ती/ भजनी मंडळाने प्रत्येक महिन्याच्या मासिकाला थंडी पाऊस वारा तसेच नैसर्गिक संकटे पडली तरी भजन जागराचे कार्यक्रम पार पाडले काकांचा हा परमार्थीक वारसा त्यांची तिन्ही मुली, सुना, नातू नाती, नातवंड हे अखंडपणे चालवतीलच त्यांच्या आयुष्यातील संस्कारावरून निश्चित दिसून येते.धार्मिक क्षेत्रात अखंडपणे झोपकून घेतलेले स्व. ह. भ. प. ज्ञानदेवराव शिंदे (काका) आमचे मामा यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

संकलन नंदकुमार कुरुमकर पत्रकार
लिंपणगाव
शब्दांकन :-शरदराव कुरुमकर माजी
संचालक खरेदी विक्री संघ श्रीगोंदा

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष