रमजानुल मुबारक - १०
रोजे आणि वैज्ञानिक फायदे
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
९२२६४०८०८२
अल्झायमर एक असा आजार आहे,ज्यामध्ये मानवी मस्तिष्कातील शिरा या स्वतःहून मृत पावतात.पार्किन्सन या आजारात माणसाच्या हातांना व शरीराला कंप सुटतो. कित्येक वेळा आपल्या शरीरात असे काही घाव निर्माण होतात कि जे सतत पाण्यामुळे व जेवणामुळे बरे होत नाही व त्यापासून गंभीर आजार बळावण्याची भीती वाटते. परंतु ज्यावेळी रोजे धरले जातात तेव्हा काही दिवसातच हे शरीराचे घाव भरायला लागतात असे निरीक्षण वैज्ञानिकांनी नोंदवले आहे.
अमेरिकेतील दहा हजार वैज्ञानिकांनी फिजिओलॉजी जनरल मध्ये एक रिपोर्ट प्रकाशित केली आहे. त्यात दाखवले आहे कि रोजामुळे मानवी शरीरात ब्लड प्रेशर व कोलेस्ट्रॉल यांची लेव्हल नॉर्मल राखण्यास मदत होते. रोजा फक्त कोलेस्ट्रॉल नॉर्मल ठेवत नाही तर रोजामुळे हृदयाशी संबंधित सर्व रोगांवर नियंत्रण मिळविता येते. हा रिपोर्ट एक अशा फिजिओलॉजी जनरल मध्ये प्रकाशित झाला आहे,ज्याच्या सर्व दहा हजार सदस्यांकडे डॉक्टरेटची डिग्री आहे.
इस्लाममध्ये जीवन आणि मृत्यूचा संबंध हा अल्लाह अर्थात ईश्वराशी संबंधित आहे. प्रत्येक व्यक्तीला ठराविक वयानंतर किंवा ठराविक कालावधीनंतर मृत्यूला सामोरे जावेच लागते. परंतु आपल्या एखाद्या चांगल्या कर्मामुळे तो दीर्घायुषी देखील होऊ शकतो. इस्लामचे प्रत्येक कर्तव्य व कुरआनच्या प्रत्येक आयतीमध्ये यशाचे गमक लुप्त आहे. तीस रोजे यासाठीच अल्लाहने अनिवार्य केले आहे कि ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या शरीराला अनेक गंभीर आजारांपासून दूर ठेवू शकतो.
जगभरातील वैज्ञानिकांच्या मते दरवर्षी नियमित रोजे धरणाऱ्यांचे आयुष्य वाढते. जे लोक रोजे धरतात, ते इतर सामान्य लोकांपेक्षा अधिक काळ जगतात.
रमजान महिन्यात प्रत्येक मानवी शरीरात एक अशी प्रक्रिया होते,जी इतर अकरा महिन्यात होत नाही. या प्रक्रियेला ऑटोफेजी प्रोसेस म्हणतात. या प्रक्रियेत शरीरात उपलब्ध पेशी या आपल्या शरीरातील इतर कमकुवत पेशी खाऊन टाकतात व त्यांच्या जागी नवीन पेशी निर्माण होतात. जपानी वैज्ञानिक युशी नोरी यांनी आपल्या या संशोधनाने पूर्ण जगाला अचंबित केले. त्यांनी हे सिद्ध केले कि या प्रक्रियेद्वारे रोजे धरल्याने कॅन्सर सारखा गंभीर आजारही बरा होऊ शकतो. कुरआनच्या 30 पाऱ्यांमध्ये अनेक प्रकारच्या यशाचे रहस्य सामावलेले आहे. 30 रोजांमुळे शरीराला आजारापासून मुक्त करण्याचे अनेक संकेत प्राप्त होतात. आज चौदाशे वर्षानंतरही विज्ञानाने इस्लामचा हा दावा खरा म्हणून सिद्ध केला आहे. इस्लाम आणि विज्ञान यांचा निकटचा संबंध आहे. जगाच्या इतिहासात अनेक मुस्लिम वैज्ञानिकांनी विज्ञान आणि इस्लाम यांची समानता वेगवेगळ्या प्रयोगांनी सिद्ध केली आहे.(क्रमशः)
--------------------------------
वाचक क्रमांक :