सर्व ऊस रसवंती गृहाचे नाव कानिफनाथ , नवनाथ रसवंती गृह का असते?
By : Polticalface Team ,02-04-2023
उन्हाळा सुरु झाला आहे आणि आणि उन्हाळ्यात आपण उसाच्या रसाचा आस्वाद नाही घेतला तर नवलच , आजपर्यंत आपण अनेक ठिकाणी रस पिले पण एक गोष्ट नेहमी सारखीच आढळली ती म्हणजे प्रत्येक उसाच्या रसाच्या दुकानाचे नाव कानिफनाथ किंवा नवनाथ असेच असते . खुप विचार केल्यानंतर उसाच्या रसाच्या दुकानदाराला याबद्दल विचारले असता त्याने दिलेले भन्नाट असे उत्तर रसवंती गृहांची नावे सारखी असण्यामागे तिथे विषय आहे आदर आणि श्रद्धेचा! पडलात ना बुचकळ्यात? चला जाणून घेवू या नावामागचे गौड-बंगाल.
भारतामध्ये अनेक संस्कृती आणि संप्रदाय आहेत. त्यातील एक दत्त संप्रदाय असून . या संप्रदायाची शाखा आहे नवनाथ संप्रदाय, ज्यातील नऊही नाथांचे गुरु आहेत भगवान दत्तात्रय, आता एक आख्यायिका अशी आहे, की या नथानपैकी कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कांनापासून झाला.
या कारणाने कानिफनाथ यांना उस, गूळ आणि ऊसचा रस अधिक आवडत असे. म्हणून त्यांच्यावरील आदरापायी रसवंती गृहाचे नाव कानिफनाथ रसवंती गृह असे ठेवले जात आहे .
पण तेथे बसलेल्या एक आजोबाने दुसरी गोष्ट अशी सांगितली की, रसवंती गृह व्यवसायामध्ये असणारे जवळपास ९०% व्यावसायिक हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर व भोर तालुक्यातले आहेत.
नाथ संप्रदायाचा या भागातील लोकांवर जास्त प्रभाव आहे. पुरंदर तालुक्या मध्ये सासवड पासून १२ किलोमीटरवर बोपगाव या ठिकाणी श्री कानिफनाथ यांची समाधी आहे.
बोपगाव कानिफनाथांचे समाधी स्थळ असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असल्याने कानिफनाथ हे बहुतेक सर्व रसवंति-गॄहचालकांचे पूजनीय दैवत आहेत. त्यामुळे हे लोक श्रद्धेने कानिफनाथ किंवा नवनाथांचे नाव आपल्या दुकानाला देत.
पूर्वी बैलानी फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर हा रस काढला जायचा. आता लोखंडी मशीन आले. बैल गेले. पण या बैलानी आपल्याला एकेकाळी जगवलेलं आहे याची आठवण या शेतकऱ्याच्या पोरांनी मनाशी जपली आहे. त्यामुळेच बैलाच्या गळ्यातले घुंगरू आजही रस काढणाऱ्या मशीन चरख्याला जोडलेले असते .
बसस्टॅण्ड हे पूर्वीचे हक्काचे असे गर्दीचे ठिकाण त्यामुळे स्टँडवर गिर्हाईक भरपुर असल्याने धंदयाचा जम बसला. मग एकाचे पाहुन दुसऱ्याने, त्याचे पाहून तिसऱ्याने असे करत रसवंती गृह वाढू लागली. त्याकाळी सहकारचा एवढा गवगवा झालेला नव्हता त्यमुळे कारखान्याला जाणार्या उसाचे प्रमाण देखील कमीच होते.
पुरंदर तालुका हा दुष्काळी तालुका असल्याने तेथील एकजण पोट भरण्यासाठी मुंबईला गेला होता . त्याने तिथे शक्कल लढवून उसाचे गंडेरे बाटलीत भरून विकायला सुरू केले आणि हा देशी मेवा मुंबईकरांना भावला आणि उस पुण्यामुंबईत प्रसिद्ध होऊ लागला , पण हे गंडेरे लगेच खराब होत असत म्हणून त्याचा रस काढून एकाच ठिकाणी दुकानासारखी त्या रसाची विक्री सुरू झाली आणि रसवंती गृहांचा जन्म झाला.
आता पुरंदर तालुक्यात कानिफनाथांची समाधी असल्याने आख्खा पुरंदर तालुका कानिफनाथांचा भक्त आहे. पोटापाण्यासाठी रसवंती गृहाच्या माध्यमातून या तालुक्यातील मंडळी महाराष्ट्रभर विखुरली पण जाताना आपल्या श्रद्धास्थान असलेल्या नवनाथांना आपल्या सोबत घेऊन गेली.
परमुलूखात गेली तरी आपली माती ही मंडळी विसरली नाहीत आणि म्हणूनच आपल्याला थंडावा देणार्या या रसवंती गृहांची नावे नवनाथ किंवा कानिफनाथ रसवंती गृह असे असते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.