गोमांस विक्री करण्याचे उद्देशाने कत्तलीसाठी जाणाऱ्या १६ बैलांची सुटका. श्रीगोंदा पोलिसांत दोघांवर प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई..

By : Polticalface Team ,02-04-2023

गोमांस विक्री करण्याचे उद्देशाने कत्तलीसाठी जाणाऱ्या १६ बैलांची सुटका. श्रीगोंदा पोलिसांत दोघांवर प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई..
श्रीगोंदा : काल दिनांक १एप्रिल २०२३रोजी आप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडी वय 38 वर्षे, व्यवसाय नोकरी (प्राणी कल्याण अधिकारी मुंबई हायकोर्ट महाराष्ट्र शासन), रा. तांदुळनेर ता. राहुरी जि. अहमदनगर. मो.क्र. 8888191203 यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला हजर होउन फिर्याद दिली की, दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी बेलवंडी फाटा येथे असताना माहीती मिळाली की, काष्टी ते श्रीगोंदा जाणारे रोडने एक आयशर टेम्पो क्रमांक MH-08-H-1947 मधुन गोवंश जातीचे जनावरे दाटीवाटीने भरुन कत्तल करण्या करीता घेवुन जात आहे. त्यावरुन श्रीगोंदा रोडवर गणपती मंदीराजवळ जावुन थांबलो असता दुपारी ४:०० वाजण्याचे सुमारास आयशर टेम्पो क्रमांक MH-08-H-1947 हा काष्टी कडुन श्रीगोंद्याकडे येताना दिसल्याने सदरचा टेम्पो थांबवुन सदर वाहन चालकाला ओळख सांगुन टेम्पोमध्ये पाहणी केली असता, टेम्पोमध्ये 16 बैल दाटी वाटीने भरलेले दिसले.

वाहन चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव लहु गोरक्षनाथ कवचट वय 31 वर्षे रा. पोखरी ता. गेवराई जि. बीड असे सांगीतले, त्याचे शेजारी बसलेल्या इसमाने त्याचे नाव नंदकुमार तुकाराम लोंढे वय 48 वर्षे रा. कोळगाव ता. गेवराई जि.बीड असे सांगीतले त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सदरचे बैलं काष्टी बाजारामधुन खरेदी करुन गेवराई, खड़कत येथे कत्तली करीता घेवुन जात असल्याचे सांगीतले..!

त्यानूसार मदतीकरीता नियंत्रण कक्ष अहमदनगर येथे फोन केल्याने श्रीगोंदा पोलीस स्टेशन चे पोलीस स्टाप आल्याने सदर दोन्ही ईसम आणि सदरचा टेम्पो श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे नेण्यात आला. आयशर टेम्पोमधील बैलांचे वर्णन खालीलप्रमाणे- 1). 5,00,000/- रुपये किंचा आयशर टेम्पो क्रमांक MH-08-H-1947. 2). 10,000/- रुपये किं.चा एक गावरान जातीचा काळ्या पांढऱ्या रंगाचा बैल. 3)1,50,000/- रुपये किं.चे दहा खिलार जातीचे पांढऱ्या रंगाचे बैल. 4) 10,000/- रुपये किं. चा एक गावरान जातीचा तांबड्या रंगाचा बैल. 5) 10,000/- रुपये किं. चा एक गीर जातीचा काळे पांढरे रंगाचा बैल. 6)20,000/- रुपये किं.चा दोन डांगी जातीचे पांढऱ्या रंगाचे बैल. 7) 10,000/- रुपये किं. चा एक गावरान जातीचा काळ्या रंगाचा बैल. 7,10,000/- रुपये एकुण या प्रमाणे ईसम नाम 1 ) लहु गोरक्षनाथ कवचट वय 31 वर्षे रा. पोखरी ता. गेवराई जि.बीड 2) नंदकुमार तुकाराम लोंढे वय 48 वर्षे रा. कोळगाव ता. गेवराई जि.बीड यांनी त्यांच्या ताब्यातील आयशर टेम्पो क्रमांक MH-08-H- 1947 मधुन वरील वर्णनाची व किंमतीच्या महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 ( सुधारणा 2015) अन्वये महाराष्ट्र राज्यात गोवंशहत्या बंदी असताना गोवंशाची हत्या/कत्तल करण्याचे प्रयोजनार्थ खेरदी करून विल्हेवाट लावण्यास प्रतिबंध असताना खरेदी करून आणून त्यांना सदर टेम्पोमध्ये कोणतीही सुरक्षीततेची काळजी न घेता त्यांना वेदना व इजा होईल अश्या पध्दतीने गाडीमध्ये निर्दयतेने दाटी वाटीने व दोरखंडाने बांधुन ठेवुन गोवंश जातीची बैल यांची कत्तल करुन त्यांचे गोमांसाची विक्री करण्याचे उददेशाने घेऊन जात असताना मिळून आले.

म्हणून, महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 चे (सुधारणा 2015) चे कलम 5 (अ) (ब) चे उल्लंघन 9, सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 (घ) प्रमाणे त्यांचेविरुध्द कायदेशीर फिर्याद आहे.
स्त्रोत:(फिर्याद)

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.