वकीलांमध्ये सुप्त नेतृत्वगुण दडलेले असतात- माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात.

By : Polticalface Team ,02-04-2023

वकीलांमध्ये सुप्त नेतृत्वगुण दडलेले असतात- माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात.
लिंपणगाव-- (प्रतिनिधी नंदकुमार कुरुमकर ) निष्ठापूर्वक काम केले की यश हमखास मिळते.वकिल होणे सहज सोपे नाही.समाजाचे नेतृत्व करण्याची क्षमता वकिलांमध्ये असते असे गौरवोद्गगार माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. येथील ऍड.सुनील कांतीलाल भोस यांच्या एस. के .भोस लिगल असोसिएट या नवीन कार्यालयाचे उदघाटन करताना ते बोलत होते.नागवडे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे अध्यक्षस्थानी होते. श्री.थोरात यावेळी म्हणाले,"भोस कुटूंबाने वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला.शेतकरी पार्श्वभूमी लाभलेल्या या कुटूंबाने शेतीत देखील नेत्रदीपक प्रगती केली.वकिलीक्षेत्रात सुनील भोस यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला.त्यांनी आपले कार्य जबाबदारीने पूर्ण केले म्हणूनच आज त्यांचे तिसरे कार्यालय दिमाखात उभे राहिले आहे.वकील होणे सोपे नाही.जी मंडळी यात यशस्वी झाली त्यांच्यात नेतृत्वगुण देखील दडलेले होते.देशाच्या व राज्याच्या राजकारणात नेतृत्व करणारां मध्ये वकिलांची संख्या अधिक आहे.लोकशाही असलेल्या देशांत देखील वकिलांनीच राष्ट्राची धुरा वाहिल्याचे पाहायला मिळते." आमदार लहू कानडे म्हणाले," सामाजिक प्रदूषण वेगाने पसरत आहे.ते दूर करण्याचे सामर्थ्य वकिलां मध्ये आहे.न्यायालयात आपल्या पक्षकारास अधिक वेगाने सेवा देण्यास ऍड.भोस यांची नवीन फर्म यशस्वी होईल". यावेळी प्रास्ताविक करताना ऍड.भोस म्हणाले,"ग्रामीण भागातील माझ्या सारख्या छोटा विद्यार्थी पुण्यात शिक्षणाला गेला,आयएलएस सारख्या संस्थेतून कायद्याची पदवी मिळवली.पंचवीस वर्षे या क्षेत्रात काम करताना अनेकांचे आशीर्वाद लाभले.पक्षकारांचा विश्वास संपादन केला.आमच्या या यशात भोस कुटूंबावर प्रेम करणाऱ्या सर्व घटकांचा मोठा वाटा आहे.याच शिदोरीवर भविष्यात अधिक जोमाने आपले कर्तव्य पार पाडत राहू." यावेळी राजेंद्र नागवडे यांचे भाषण झाले.त्यांनी भोस कुटूंबाने आजवर केलेल्या सामाजिक अन राजकीय तसेच कायद्याच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आवर्जून उल्लेख केला.वकील संघाचे अध्यक्ष ऍड.रोडे यांनी श्रीगोंदा बार साठी जागेचा व चेंबरचा विषय मांडला.ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी आभार मानले. या प्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे,माजी सभापती अरुणराव पाचपुते,माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शेलार,श्रीगोंदा वकील संघाचे अध्यक्ष ऍड.अशोक रोडे,राकेश पाचपुते,सुनील माने,योगेश भोईटे,विलासराव काळे,उत्तम लांडगे, प्रशांत दरेकर, विजय कापसे, विलासराव काकडे, विठ्ठलराव दरेकर,सतीश जामदार, आढळगावचे सरपंच शिवप्रसाद उबाळे,खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे,सुधीर जामदार,दिनकर जामदार,भावडीचे सरपंच,सोसायटीचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजर होते.
आधी वकील मग आमदार.. आमदार.थोरात यांनी यावेळी आपल्या राजकारणातील श्रीगणेशा सांगितला.ते म्हणाले,"मी देखील पुण्यात आयएलएस चा विद्यार्थी.१९७८ ला वकील म्हणून पास आउट झालो. वडील आमदार होते.गावाकडे आल्यावर शेतीवाडी पाहून उरलेल्या वेळात लोकांची कामे करावी लागत.अडीअडचणी सोडवताना जनतेच्या समस्या कळू लागल्या. त्या सोडवताना लोकसम्पर्क वाढला.मला आमदार होण्यात वकील असण्याचा मोठा फायदा झाला.मी आजही संगमनेर बारचा सदस्य आहे." ___________________


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.