By : Polticalface Team ,02-04-2023
मढेवडगाव तालुका श्रीगोंदा येथील सेवा संस्थेचे माजी चेअरमन स्व ज्ञानदेवराव शिंदे यांचे प्रथम पुण्यस्मरण आयोजित करण्यात आले होते. यावेळी रामलिंग देवस्थान शिरूरचे रामायणाचार्य ज्ञानेश्वर महाराज रासकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी आपल्या किर्तन रुपी सेवेत बोलताना ह भ प रासकर महाराज पुढे म्हणाले की, मृत्यूनंतर विजय मिळवणे म्हणजे जीवनात सत्कार्य करून कीर्ती मिळवणे हा होय. त्यासाठी जीवनात आपले कर्म योग्य असायला हवे. हे तत्व स्वर्गीय ज्ञानदेवराव शिंदे यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात तंतोतंत पाळले. स्वतःच्या मुलावर प्रेम करताना तितकेच इतरांच्या मुलांवर देखील प्रेम आवश्यक आहे. ते प्रेम मग ते कोणत्याही जाती-धर्माची व्यक्ती असो त्यांच्यावर आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये काकांनी केले. एखाद्याच्या मृत्यूची बातमी कानावर पडली तर निश्चितच दोन थेंब आश्रुवाटे यावेत. यालाच प्रखर भावना व मानवप्रेम म्हणतात. असे सांगून रासकर महाराज पुढे म्हणाले की, तुकोबाराय म्हणतात की, गोड कर्म केल्यानंतर शेवट देखील गोड होतो." शेवट हा माझा बहु गोड झाला" असे मधुर वाणीतून विवेचन करताना राजकारणामध्ये तात्विक मतभेद जरूर असावेत, परंतु मनभेद नसावेत. हेच तत्व ज्ञानदेव काकांनी सर्व क्षेत्रात जोपासले. विरोध हा व्यक्तीचा नसावा तत्त्वाचा असावा. एखाद्याचा संसार जाळीमुळी सहित राजकारणात भरडू नये त्यातून सुडाचे राजकारण निर्माण होते. त्यातूनच खराब विरोध उदयास येतो.
रासकर महाराज आणखी पुढे म्हणाले की, राजकारणातून निवृत्त होताना अध्यात्माची कास धरावी हेच तत्व मढेवडगावच्या शिंदे परिवार जाणले. शिंदे परिवार हे समर्थ प्रेम देणारे कुटुंब आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात या कुटुंबाने अध्यात्मा बरोबर अनेक माणसे जोडली. या परिवाराने राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करताना टोकाचे राजकारण कधीच केले नाही. त्यासाठी प्रत्येकाने लोकशाहीतून समाज हित पाहायला हवे. व्यवहार आणि अध्यात्माची सांगड प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनामध्ये असायला हवी. माहेरात जेवढे सुख मिळत नाही. तेवढे सासरी मिळते ही जुन्या स्त्रियांची खरी ओळख होती. ज्याप्रमाणे दिवाळी सन कधी येतो अन माहेरी कधी जाते. तसेच कार्तिकी आणि आषाढी एकादशी म्हटले की पंढरपूरची आठवण होते. यालाच भक्ती म्हणतात. वडिलांचे महत्त्व सांगताना रासकर महाराज आणखी पुढे म्हणाले की, आकाशापेक्षाही वडिलांचे उंच स्थान आहे. निर्णय बरोबर असेल तर वडिलांची संपूर्ण परिवारावर थाप पडते. घराला एक प्रकारे मोठा जन आधार असतो. ते म्हणजे वडिलांचे छत्र असते. संपूर्ण परिवाराला तो वडिलांचा भक्कम आधार असतो. मुलींनी देखील आपल्यावर वडिलांनी जे शिक्षण, संस्कार आणि सासर दिले. त्यामध्ये आत्मिक समाधान मानावे. कारण लहानपणापासून शिक्षण व संस्कारासाठी वडिलांनी आपल्या संपूर्ण जीवनात होळी केलेली असते. माहेरी आई-वडिलांच्या वास्तव्याने निश्चितच आनंद मिळतो. असे सांगून महाराजांनी आईबरोबरच वडिलांचे स्थान व महत्त्व या प्रवचन रुपी सेवेत उपस्थित भक्तांना पटवून दिले.
या प्रवचन रुपी सोहळ्यास सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, संचालक सुभाषराव शिंदे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे, राकेश पाचपुते, पृथ्वीराज नागवडे, बाळासाहेब शेलार, कर्जतचे माजी सभापती किरण पाटील, अनिलराव पाचपुते, विश्वनाथ गिरमकर, रामचंद्र नागवडे, सुभाषराव कळसकर, प्राचार्य सतीशचंद्र सूर्यवंशी आदींसह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. सूत्रसंचालन प्रा नंदकुमार पवार यांनी केले. आभार नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे यांनी मानले. वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष