रमजानुल मुबारक - ११, संयम - रोजाचा स्थायीभाव

By : Polticalface Team ,03-04-2023

रमजानुल मुबारक - ११, संयम - रोजाचा स्थायीभाव रमजानुल मुबारक - ११
संयम - रोजाचा स्थायीभाव
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
९२२६४०८०८२
रमजान महिन्याचा दुसरा अशरा आता सुरु झाला आहे. दैनंदिन दिनक्रम आता स्थिर झाला आहे . उन्हाळ्याचा त्रास ही काही अंशी अंगवळणी पडला आहे.पूर्वी मंदिरे, मशिदी या कच्च्या होत्या मात्र भक्ति करणारे भक्त पक्के होते.आता खूप बदल झालाय. रात्रीच्या नमाज मध्ये स्लबमध्ये होणारी गरमीची तीव्रता कमी करण्यासाठी मशिदींमधून कुलरची व्यवस्था करण्यात येत आहे.प्रार्थना करतांनाही आरामात विना त्रास करण्याची प्रवृती वाढत आहे.आपण उन्हाळ्याची थोडीशी तीव्रता सहन करु शकत नाही,मग जे रात्रंदिवस भट्टी समोर उभे राहून कार्य करतात ते कसे सहन करीत असतील त्यांची जाणिव यानिमित्ताने सर्वांना होत असेल. रमजान महिन्यातील रोजे म्हणजे केवळ उपाशी राहणे नव्हे . संयम(सब्र)निर्मिती हा देखील रोजाचा स्थायीभाव आहे. म्हणूनच रमजानला सब्र का महिना असे ही म्हटले जाते.रमजान मध्ये रोजे सुरू केल्यानंतर आपण स्वतःच काही बंधने लादून घेत असतो.एकदा पहाटे सहेरी खाण्याची वेळ संपल्यानंतर सूर्यास्तापर्यंत काही ही न खाण्याचा निश्चय स्वतःच करीत असतो.हीच स्वयंशिस्त आपल्यामध्ये संयम निर्माण करते. उपवास केल्याने भुकेल्याची अवस्था, तहानलेल्यांची व्याकुळता याची जाण आपल्यात निर्माण होते. ज्यांना वेळेवर खायला अन्न मिळत नाही त्यांची काय अवस्था होत असेल याची जाणिव निर्माण होते. जे तहानलेले असतात त्यांच्या प्रती सहानुभूतीची भावना निर्माण होते. आपल्याला सर्व सुखे प्राप्त आहेत परंतु या जगात जे दीन आहेत, गरीब, अनाथ आहेत ते आपले जीवन कसे जगत असतील याची जाणिव रोजामुळे निर्माण होते.एकदा रोजा धरल्यानंतर सायंकाळपर्यंत आता काहीही सेवन करायचे नाही अन्यथा ईश्वर नाराज होईल ही भिती मनात बाळगून आपण मगरीबची वेळ होण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. अकरा महिने मगरीब आपली वाट पाहते पण या महिनाभर आपण मगरीबची प्रतिक्षा करीत असतो. एक मिनीट जरी इफ्तारला वेळ असेल व आपल्याला कितीही तहान लागलेली असली तरी आपण समोरच्या पाण्याच्या ग्लासला हात लावीत नाही, स्वयंशिस्तीचे यापेक्षा दुसरे उदाहरण शोधूनही सापडणार नाही. समाजातील जे गरजू घटक आहेत त्यांच्या गरजांची जाणिव व्हावी व या गरजा पूर्ण करण्याची भावना आपल्यात निर्माण व्हावी हा रोजाचा मूळ उद्देश आहे. रोजाच्या माध्यमातून ईश्वरी आदेशांचे पालन करुन आपले वर्तन सदाचारी करण्याबरोबरच आपल्या स्वच्छंदी आचरणाला लगाम घालून स्वतःच स्वतःवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न रोजेदार हा करीत असतो.(क्रमशः) --------------------------------

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष