कारखाने बंद होऊन महिना झाला, अद्याप ऊसबिले नाहीत ▪️ जनशक्ती आंदोलनाच्या पवित्र्यात; करमाळा तहसीलदारांना दिले निवेदन

By : Polticalface Team ,03-04-2023

कारखाने बंद होऊन महिना झाला, अद्याप ऊसबिले नाहीत
▪️ जनशक्ती आंदोलनाच्या पवित्र्यात; करमाळा तहसीलदारांना दिले निवेदन करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका व परिसरातील कारखाने बंद होऊन महिना उलटून गेला. तरीही शेतकऱ्यांच्या उसाची बिले मिळाली नाहीत. एफ आर पी कायद्यानुसार शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला गेल्यावर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर किंवा रोख स्वरूपात उसाचे बिल देणे बंधनकारक असताना तालुक्यातील आदिनाथ, मकाई, कमलाई, भैरवनाथ विहाळ, हिरडगाव, हळगाव अधिकारखान्यांनी अद्याप बिली दिले नाहीत. या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील संगोबा मंदिर, संगोबा येथे जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विनंतीवरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवत करमाळा तहसीलदारांना निवेदन दिले आहे. या बैठकीमध्ये ७४ गावातील शेतकरी एकत्र आले होते. या गावांमध्ये तालुक्याशेजारी सर्वच साखर कारखाने यांच्या ऊसतोड टोळ्या होत्या. ज्यामुळे या करमाळा शेजारील गावांचा सर्वच साखर कारखान्यांना या उत्पादकांनी ऊस दिला आहे. ऊस दर एफ आर पी नुसार आणि 14 दिवसाच्या आत देणे बंधनकारक असताना कारखाने बंद होऊन महिना उलटला तरी देखील डिसेंबर - जानेवारी या महिन्यात गेलेल्या उसाचे बिल कोणत्याही कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेले नाही. म्हणून सर्वच शेतकरी हतबल झाले आणि जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांना विनंती करून आज बैठक घेण्याचे विनंती केली आणि ठरल्याप्रमाणे आज बैठकीला सर्वच गावांमधून प्रत्येक शेतकरी आला होता. यामध्ये पुढील दिशा ठरली. ऊस बिल कशी मिळवायची याची योजना ठरली, यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी भाऊ म्हणतील तसं कुठल्याही आंदोलनाचा पवित्रा घ्या आम्ही आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत तिथे उपलब्ध असेल. असेही शेतकऱ्यांनी सांगितले. त्यानुसार करमाळा तहसील येथे सदर आंदोलनाचे निवेदन माननीय पोलीस निरीक्षक करमाळा आणि माननीय तहसीलदार करमाळा यांना देण्यात आले. यावेळी जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी तुमच्या कामाचा पैसा ,कष्टाचा पैसा ,प्रामाणिकपणाचा पैसा मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही उपस्थित शेतकरी वर्गाला दिली. यावेळी दक्षिण वडगावचे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सचिन काळे, मांगीचे बागल सर, बालाजी तरंगे, दादासाहेब गायकवाड, रामराजे डोलारे, किशोर शिंदे, नयन मस्के, बिबीशन शिरसाट, शरद एकाड, भाऊसाहेब जाधव, मंगेश बदे,अभिषेक राऊत,जयसिंग घाडगे ,पप्पू ढवळे, नाना भोगल, भरत नलावडे, साहेबराव विटकर, अजित सय्यद,वैभव मस्के.राजाभाऊ मल्लाव,अशोक नगरे,गणेश वायभासे ,भोसले चेअरमन,शिवाजी शिंदे आणि ७४ गावातील ऊस उत्पादक शेतकरी उ,पस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष