By : Polticalface Team ,03-04-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०३ एप्रिल २०२३ रोजी दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक प्रक्रिया जाहिर झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील पुढील येणाऱ्या सर्व निवडणुका जोमाने लढण्याचा निर्णय घेतला आहे.
दौंड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक नुकतीच जाहीर झाली असल्याने,या निवडणुकीत कृषी सहकारी पतसंस्था सदस्य, बहुउद्देशीय सहकारी संस्था सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, लोकसेवेतील व कार्यक्षम उमेदवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १८ जागांसाठी २१० उमेदवारांनी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हर्षद तावरे यांनी दिली,
दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवा सहकारी सोसायटी, मतदार संघाच्या सर्वसाधारण जागेसाठी १०१ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, सेवा सोसायटी महिला राखीव जागेसाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघात ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, तसेच सेवा सहकारी संस्थेच्या इतर मागासवर्गीय जागेसाठी १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, तर ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघात ४५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे, तसेच आडते मतदार संघात ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असुन हमाल मापारी मतदारसंघात २ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, दौंड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
दि ०५/०४/२०२३ रोजी उमेदवारी अर्ज पडताळणी व छाननी करण्यात येणार असून दि २०/०४/२०२३ पर्यंत निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली असून उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे, दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया परिशिष्ट एक प्रमाणे दि २८/०४/२०२३ रोजी मतदान होणार असुन, परिशिष्ट २ प्रमाणे दि ३०/०४/२० २३ रोजी मतदान होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यवत गावातील माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य नाथदेव सुदाम दोरगे यांना दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाची निवडणुक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, दौंड तालुका पश्चिम भागातील यवत ग्रामपंचायत १७ सदस्य असुन देखील यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यवत ग्रामपंचायत सर्वसाधारण जागेसाठी संधी उपलब्ध करण्यात आली नव्हती, मात्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार राहुल कुल यांनी यवत गावचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य नाथदेव सुदाम दोरगू यांना ग्रामपंचायत सर्वसाधारण जागेसाठी उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे, दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुक ग्रामपंचायत सर्वसाधारण जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे, या प्रसंगी दौंड तालुक्यातील व यवत पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायत तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, दौंड तालुका पंच्छिम भागातील अधिक ग्रामपंचायत सदस्यांनी मनापासून उमेदवार दोरगे यांचे अभिनंदन केले आहे.
दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत तालुक्यातील एकुण ८० ग्रामपंचायतीचा सहभाग असुन या निवडणुकीत ८७६ मतदार आपल्या मतदानाचे कर्तव्य बजावणार आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष