11 एप्रिल पासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन टेल टू हेट प्रमाणे सुरू होणार

By : Polticalface Team ,04-04-2023

11 एप्रिल पासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन टेल टू हेट प्रमाणे सुरू होणार करमाळा प्रतिनिधी दिनांक 5 जानेवारी 2023 पासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन टेल टू हेड प्रमाणे सुरू झालेले असून सदर रब्बी आवर्तन 28 फेब्रुवारी रोजी संपणे अपेक्षित असतानाही ते आवर्तन अद्यापही सुरूच आहे. हेडकडील काही गावे अद्यापही रब्बी आवर्तनापासून वंचित आहेत.सदर गावांना 10 एप्रिल पर्यंत पाणी देण्याचे नियोजन असून दिनांक 11 एप्रिल पासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन टेल टू हेड याप्रमाणे सुरू होईल अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. दिनांक 11 ते 14 एप्रिल रोजी टेल चारीने घोटी आणि मलवडी , दिनांक 15 ते 16 एप्रिल उजवी चारी क्रमांक 11 या चारीने निंभोरे ,दिनांक 17 ते 22 एप्रिल रोजी चारी क्र.6 वरून घोटी, वरकुटे, साडे आळसुंदे, दिनांक 23 ते 24 एप्रिल रोजी उजवी चारी क्रमांक 10 वरुन निंभोरे, दिनांक 25 ते 30 एप्रिल रोजी उजवी चारी क्रमांक 9 या चारीवरून निंभोरे व लव्हे ,दिनांक 1 मे ते 4 मे डावी चारी क्रमांक 4, थेट विमोचक 3 यावरून साडे व कोंढेज तलाव, दिनांक 5 ते 6 मे रोजी डावी चारी क्रमांक 3 वरून सौंदे ,साडे,फीसरे, सालसे ही गावे, दिनांक 7 ते 10 मे रोजी डावी चारी क्रमांक 1, उजवी चारी क्रमांक 6 व थेट विमोचक क्रमांक 1 वरून गुळसडी, कुंभेज, सरपडोह , शेलगाव क ही गावे तर दिनांक 11 ते 13 मे उजवी चारी क्रमांक 2 व देवळाली वितरीका यावरून देवळाली ,पांडे ,खडकेवाडी या गावांना पाणी मिळेल.
शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे - संजय अवताडे. उपअभियंता. दहिगाव उपसा सिंचन योजना ही 2 टप्प्यातील उपसा सिंचन योजना असून या योजनेचे किमान विज बिल भरणा करण्यात इतपत पाणीपट्टी सध्या शेतकऱ्यांकडून आकारली जात आहे. ही पाणीपट्टी भरून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे . दहिगाव योजना उन्हाळी आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर केलेले असले तरी लाईन ट्रिप होणे, पंप प्रॉब्लेम, एअर वॉल लिकेज या तांत्रिक बिघाडामुळे वेळापत्रकामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी