By : Polticalface Team ,04-04-2023
रमजानुल मुबारक - १२
जग निर्माता , पालनकर्ता - ईश्वर अर्थात अल्लाह
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
९२२६४०८०८२
रमजान महिन्यात सर्वत्र कुरआन शरीफचे पठन होत असतांना त्यातील आशयाचे विवेचन ( तफसीर ) भाषांतरित करुन केले जाते. अरबी आयतांचा अर्थ आपल्या मातृभाषेत स्पष्ट केला जातो. प्रेषित हजरत पैगंबरांनी अल्लाहचे फरमान कुरआनच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचविले. त्याला काय पसंत आहे व काय नापसंत आहे, माणसांनी कसे आचरण करावे व कसे करु नये. या सृष्टीतील सर्व चराचर गोष्टींचा निर्माता हा ईश्वर अर्थात अल्लाह आहे. त्याचेच नियंत्रण सर्वत्र आहे. तो ज्ञात, अज्ञात , दृश्य किंवा गुप्त सर्व गोष्टी जाणणारा आहे. त्याची उत्कृष्ट अशी अनेक नावे आहेत. प्रत्येक वस्तूला स्वरुप प्रदान करणारा व तिला मार्ग दाखविणारा तोच आहे. तो चिरंजीवी व चिरस्थायी आहे. माणसाला ऐकण्याची व पाहण्याची क्षमता व विचारी मन दिले आहे. जीवन व मृत्य देणाराही तोच आहे. पृथ्वी व तिच्या सर्व वस्तू त्याच्याच आहेत.सप्त आकाशांचा स्वामी व सर्वाधिकारी तोच आहे. त्याचा कोणीही भागीदार नाही. तोच सर्वसृष्टीचा पालनकर्ता आहे. आपल्या मनातील लपविलेल्या व प्रकट केलेल्या सर्व गोष्टी त्याला ज्ञात आहेत. त्याच्या अस्तित्वाखेरीज इतर सर्व काही नश्वर व नाशवंत आहे. तोच सृष्टीचा प्रारंभकर्ता व पुनरावृती करणारा आहे. तो कधीही वचन भंग करीत नाही. तो सूक्ष्मदर्शी आहे. त्याला सर्व गोष्टींची खबर असते. सर्व स्तुती त्याच्यासाठीच आहे. तो बुध्दीवंत, माहितगार, परम कृपाळू व क्षमाशील आहे. प्रत्येक वस्तूवर त्याचे आधिपत्य आहे. तोच बनविणारा व तोच बिगडवणारा आहे. अपराधांना माफी देणारा व पश्चाताप स्विकारणारा तोच आहे. तो नजरेच्या चोरीला व ह्रदयातील रहस्यांनाही जाणणारा आहे. तो जेवढा क्षमाशील आहे तेवढाच यातनादायक शिक्षा देणाराही आहे. तो सर्वसाक्षी आहे. तोच वाली व त्राता आहे.
आपल्या भक्तांवर तो फार कृपाळू आहे. असत्याला नष्ट करतो. आशा आणि निराशा निर्माण करणारा तोच आहे. तो सृष्टीचा स्वामी आहे. हवे त्याला मुले देतो, हवे त्याला मुली देतो, हवे त्याला दोन्ही देतो व हवे त्याला वांझ बनवितो. तोच हसवितो, तोच रडवितो, तोच मरण व जीवन देतो, तोच धनवान बनवितो , संपत्ती प्रदान करतो, तोच भिकारी बनवितो . अशा प्रकारे ईश्वराचे सामर्थ्य व अधिकारांचे वर्णन कुरआन मध्ये विविध ठिकाणी केलेले आहे. अल्लाहने माणसाला निर्माण केले त्याची आराधना करण्यासाठी. एकमेकांना साह्य करण्यासाठी. अल्लाहने एक पुरुष आदम व एक स्त्री हव्वा निर्माण केली. या जगभरातील सर्व स्त्री पुरुष माणसे ही या जोडीची अपत्ये. लाक्षणिक अर्थाने सर्व एकमेकांचे नातेवाईकच. सर्व मानवजातीच्या रक्ताचा रंग एकच लाल. पण आजचे चित्र काय दिसते. माणसंच एकमेकांची वैरी झालेली दिसतात. भविष्यातील भारतासाठी हे चित्र परवडणारे नाही. भगवान महावीरांचा शांती, अहिंसेचा विचार आज पुढे नेण्याचा सर्वांनी विचार करावा.(क्रमशः)
----------------------------------------
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष