रमजानुल मुबारक - १३, इन्सानियत (मानवता) हाच मोठा धर्म

By : Polticalface Team ,05-04-2023

रमजानुल मुबारक - १३, इन्सानियत (मानवता) हाच मोठा धर्म रमजानुल मुबारक - १३
इन्सानियत (मानवता) हाच मोठा धर्म
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
९२२६४०८०८२
रमजान महिन्याचा दुसरा भाग (अशरा) मगफिरत सध्या सुरु आहे. रहेमत( कृपादृष्टी)चा काळ पूर्ण होऊन मगफिरत (माफी)चा दुसरा भाग सुरु होऊन तीन दिवस झाले आहे. कुरआन आणि त्याची शिकवण यावर जे संशोधन,विचारमंथन आजपर्यंत झालेले आहे त्यानुसार एक गोष्ट स्पष्ट झाली आहे कि कुरआन हा मानवनिर्मित ग्रंथ नाही. कुणा विद्वानाने तो लिहीलेला नाही तर त्यातील शब्द,आयती, सुरए हे साक्षात परमेश्वर अर्थात अल्लाहने निर्माण केले आहेत. अरब जगतासह अनेक ठिकाणी कुरआन मधील आयता सारखी वाक्ये तयार करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला.पण त्यात कुणी ही यशस्वी होऊ शकला नाही. त्यातील एक एक शब्द हा मोठा अर्थपूर्ण असून कुरआन हा दैवी ग्रंथ आहे यावर शिक्कामोर्तब करणारा आहे.

प्रेषित हजरत पैगंबरांनी अल्लाहच्या आदेशाने ज्यावेळी इस्लामचा प्रसार सुरु केला. त्यावेळी सामाजिक परिस्थिती खूप बिघडलेली होती. सामाजिक अधापतनाच्या सर्व सीमा ओलांडल्या गेल्या होत्या. रानटी प्रवृत्तीनी थैमान घातले होते.गडद अंधारात एक काजवा चमकावा व त्यामुळे क्षणभर तरी तो अंधार दूर व्हावा त्याप्रमाणे हजरत पैगंबरांच्या रुपाने समाजाला दिशा देणारा मार्गदर्शक अल्लाहने निर्माण केला.त्यांनी अल्लाह कडून प्राप्त होणारे आदेश लोकांपर्यंत पोहोचविले व नविन समाज निर्मितीचा प्रारंभ झाला.सुरुवातीला हा आरंभ करतांना हजरत पैगंबरांना मोठा त्रास सहन करावा लागला. परंतु जसजसे सत्य समोर येत गेले तसे त्यांचे विरोधक ही समर्थक बनले.समाजातील अनेक अनिष्ट प्रथा हजरत पैगंबरांनी झुगारुन दिल्या. मानवता,समता व समरसतेचा संदेश समाजाला दिला.आपण सर्वसमान आहोत. कुणीही ज्येष्ठ अथवा कनिष्ठ नाही.सर्वजण आपसात भाऊ भाऊ आहोत ही नवी संकल्पना त्यiनी समाजाला दिली. सामाजिक न्यायाच्या अनेक गोष्टी त्यांनी विशद केल्या. मुलींच्या जन्माचा तिटकारा करणारांना समज दिली.अल्लाहची उपासना हीच एकमेव भक्ती असून तोच एकमेव उपास्य आहे. इतर कुणीही पूजनीय नाही असे सांगून एकेश्वर वादाचा पाया घातला.

आपसातील भांडण, तंटे,वाद हे निरर्थक असल्याचे सांगून क्षुल्लक गोष्टींवरून रक्तपात करणारांना माणुसकीची शिकवण दिली.सुख,दुःख,हमदर्दी यांची नवी संकल्पना त्यांनी मांडली. ईश्वरभक्ति केल्याने मनाला प्राप्त होणारी शांती हेच जीवनाचे सार आहे हे स्पष्ट केले. स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगा. समाजाच्या प्रती ही तुमची काही कर्तव्ये आहेत हे त्यांनी स्पष्टपणे मांडले. स्वार्थ आणि परमार्थ यातील फरक स्पष्ट केला.ईतरांच्या भल्यासाठी जगला तोच इन्सान होय.ही नवी संकल्पना त्यांनी निर्माण केली.

आज जगामध्ये अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे.व्यभिचार, दुराचार वाढत आहे. कुटुंबातील माणसं सांभाळणे अवघड झाले आहे.कधी काय होईल याचा नेम राहिलेला नाही.अशा गंभीर प्रसंगी हजरत पैगंबरांची शिकवण आचरणात आणणे आवश्यक आहे. (क्रमशः) ------------------------------------

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष