By : Polticalface Team ,05-04-2023
करमाळा प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे आमदारांच्या वार्षिक परिक्षेचा निकाल असून मंजूर निधी बाबत आ. संजयमामा शिंदे यांनी त्यांचे प्रगतीपुस्तक जनतेसमोर मांडावे, असे आव्हान पाटील गटाचे प्रवक्ते सुनील सदाशिव तळेकर यांनी केले. याबाबत सविस्तर बोलताना तळेकर पुढे म्हणाले की अर्थसंकल्पीय अधिवेशन संपून आठवडा उलटून गेला तरी आमदार महोदयांनी करमाळा मतदार संघातील दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी किती निधी मंजूर करुन घेतला हे अजून जनतेला सांगितले नाही. एकोणीस वर्षे रखडलेली ही योजना माजी आमदार नारायण पाटील यांच्या सततचा पाठपुरावा व अथक प्रयत्नांनंतर कार्यान्वित झाली. तालुक्याच्या पुर्व भागातील दहा हजार पाचशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणारी ही योजना आज तिचे उद्दीष्ट पुर्ण करु शकत नाही. सन 2019 पासुन पुढे विद्यमान आमदार हे आयत्या पिठावर रेघोट्या मारत आहेत. एक गुंठाभर वाढीव क्षेत्र या तीन वर्षात ओलिताखाली आले नाही आणि एक रुपयाचाही निधी या योजनेसाठी या तीन वर्षात आणला गेला नाही. आजमितीस केवळ कॅनालच्या म्हणजेच मुख्य चारी आणि काही ठिकाणी उपचारी यांच्या आसपास असणारे बोटावर मोजता येईल एवढेच क्षेत्र ओलिताखाली येत आहे. सुप्रमाचा ढोल बडवून झाला, सन 2024 पर्यंत दहिगाव उपसा सिंचन योजना पुर्ण क्षमतेने व पुर्ण क्षेत्र ओलिताखाली आणून चालू होईल ही पोकळ घोषणाही देऊन झाली.आता आमदार महोदयांनी जनतेसमोर आपण निष्क्रिय असल्याची कबूली देण्यासाठी एखादा गावभेट दौरा आखावा असा हल्लाबोल तळेकर यांनी केला. करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांची ओळख सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी आहे. विशेषतः राज्यसभा व विधानसभेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकी नंतर तर आ. संजयमामा शिंदे उभ्या महाराष्ट्राला परिचीत झाले. एकीकडे सोलापूर जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांची प्रतिमा आहे. परंतू तरीही राज्याच्या अर्थसंकल्पातून विकासनिधी खेचुन आणण्यात सोलापूर जिल्ह्यात त्यांचा शेवटचा क्रमांक असावा ही बाब सर्वांनाच आश्चर्य वाटायला लावणारी अशी असल्याचा मार्मिक टोला प्रवक्ते सुनील सदाशिव तळेकर यांनी लगावला.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष