By : Polticalface Team ,06-04-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०५ एप्रिल २०२३ दौंड तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ११ एप्रिल रोजी सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले जयंती महोत्सव, देशात व राज्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, महाराष्ट्र शासनाने ११ एप्रिल रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी दौंड तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष मंगेश राजाराम रायकर यांनी जिल्हा व राज्य स्तरीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच
दौंड तालुका तहसिलदार कार्यालय, येथे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या प्रसंगी दौंड तालुका अध्यक्ष मंगेश राजाराम रायकर, तसेच महाराष्ट्र राज्य, व जिल्हास्तरीय अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, महाराष्ट्र राज्यातील वरीष्ठ अधिकारी तहसीलदार याचा संप काळ सुरू असल्याने दौंड तहसिल कार्यालयातील कुळकायदा शाखा अव्वल कारकून, गिरीश भालेराव यांनी सदर निवेदन स्वीकारले असून संबंधित वरीष्ठ अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांच्या जनकल्याणी कार्याचा आढावा पाहता महात्मा फुले यांनी देश हितार्थ राज्यातील बहुउद्देशीय कार्य केले आहेत, खडकवासला धरणाचे बांधकाम, पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील शासकीय सेंट्रल बिल्डिंग इमारतीचे बांधकाम केले, गंजपेठेतील अस्पृश्य मुलींची पहिली शाळा भिडे वाड्यात सुरू केली, मागासवर्गीय अस्पृश्य समाजासाठी पिण्याच्या पाण्याचा हाऊद खुला केला, त्यामुळे राज्यातील अस्पृश्यता संपुष्टात आनुण परिवर्तन घडवले आहे, परस्थिती बदली स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हि मुल्ये भारत देश नव्हे तर पूर्णविश्वात रुजविण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडवरील समाधी शोधून काढली,व कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजयंती उत्सव सुरु केला, पोवाड्याच्या माध्यमातून मराठी भाषा साता समुद्रा पार पोचवली, छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रथम शिवचरित्राचे लिखाण तात्यासाहेब महात्मा फुले यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जगासमोर आणला.
कुळवाडी भूषण रयतेचा राजा या उपमा देऊन बहुजन समाज बांधवांना सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून जागृत केले, देशातील व राज्यातील बहुजन व मागासवर्गीय अस्पृश्य समाजातील शोषित पिढीत वंचित असलेल्या समाजातील मुली मुलांना व स्त्रियांना प्रस्थापितांनी शिक्षणापासून वंचित ठेवले होते, मात्र तात्यासाहेब महात्मा फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षण खुले केले, या महान कार्याची दखल घेण्या ऐवजी शनिवार वाड्यातील तत्कालीन व्यवस्थेने गोविंद रावच्या पोराने धर्म बाटवला म्हणून वाळीत टाकले, तरी कोणाच्याही दबावाला बळी न पडता तात्या साहेबांनी मागासवर्गीय यांच्या जाती येत्येच्या बेड्या तोडून उलथुन टाकल्या, त्यांनी अधिक जोमाने कार्य सुरू ठेवले होते, पुस्तकातील लिखाणाच्या माध्यमातून बहुजन समाजाला शिक्षित व जागृत केले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले त्यांचे अपूर्ण कार्य भारतीय संविधानाच्या चौकटीत समावेश करुन स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय कायम स्वरुपी ठेवले आहे, भारत देश व महाराष्ट्र राज्याला दिशा देणारी महत्वाची भुमिका तात्या साहेबांनी जोपासली होती, त्यामुळे महाराष्ट्र राज्यात महात्मा जोतिबा फुले ११ एप्रिल रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी प्रतिक्रिया सर्व सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे, महाराष्ट्र शासनाने शासकीय सुट्टीचा आदेश तत्काळ देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या प्रसंगी, मंगेश राजाराम रायकर. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद दौंड तालुका कार्याध्यक्ष..डॉ. दत्तात्रय ब. जगताप ( राज्य संयोजकIMP) निलेश पो. बनकर (जिल्हा संयोजक सत्यशोधक ओबीसी महासंघ) निलेश शेंडे (सत्यशोधक ओबीसी महासंघ) नवनाथ माने (छत्रपती क्रांती सेना दौं.ता.अध्यक्ष) रामचंद्र भागवत (क्रांतीजोती प्रतिष्ठाण पाटस) प्रमोद भागवत (क्रांतीजोती प्रतिष्ठाण) दत्ता माने (क्रांतीजोती प्रतिष्ठाण) अमोल भागवत (राष्ट्रिय फुले ब्रिगेड दौं. ता. अध्यक्ष) जयश्री भागवत (राष्ट्रवादी युवती कार्याध्यक्ष माजी सरपंच कुरकुंब) राजाराम होले (माजी सरपंच गोपाळवाडी) विजय गिरमे (अ.भा.महात्माफुले समता परिषद पुने जि. सरचिटणीस) सचिन शिंदे (अध्यक्ष दौंड तालुका ओबीसी सेल) सचिन डेंबळकर (उपाध्यक्ष ओबीसी सेल) अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व समविचारी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष