By : Polticalface Team ,06-04-2023
मुंबई येथील मंत्रालयात पर पडलेल्या राज्य कृषि पणन मंडळाची सभा पार पडली. या बैठकीस राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, राज्य कृषि पणन मंडळाचे संचालक बाळासाहेब नाहाटा, राज्याचे सहकार व पणन खात्याचे मुख्य सचिव अनुपकुमार, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दिपक शिंदे हे उपस्थित होते.
यावेळी नाहटा यांनी शेतकऱ्यांच्या कांदा अनुदानाबाबत निर्माण झालेल्या प्रश्नावर बोलताना शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद नाही त्यामुळे पंचनामे करताना शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचीत रहावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कांदा पिकाची नोंदी बाबतची अट शिथील करण्यात यावी अशी मागणी राज्य बाजार समिती सहकारी संघाचे वतीने करत शेतकऱ्यांना सरसकट कांदा अनुदान जाहीर करावे अशी विनंती केली. तसेच राज्यातील क आणि ड वर्गवारीत असलेल्या बाजार समित्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करत त्यांना अ आणि ब वर्गवारीत आणण्यासाठी मदत करावी, राज्यातील १०० बाजार समितीमध्ये प्रत्येकी १ हजार मे. ट. गोडाऊन उभारण्यासाठी मदत करावी, फळ प्रक्रिया करण्यासाठी तळेगाव दाभाडे या ठिकाणी रेडिएशन सेंटर उभारण्याची परवानगी मिळावी, राज्यातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेश आणि मुंबई या सहा विभागात विभागीय कार्यालय उभारण्यासाठी दहा कोटींची मागणी करत पणन मंडळामार्फत नागपूर औरंगाबाद महामार्गावर नागपूर आणि भिवंडी येथे मॉडेल मार्केट उभारण्याची परवानगी मिळावी या मागणीसह विविध मागण्या यावेळी पणन महामंडळातर्फे करण्यात आल्याची माहिती नाहटा यांनी दिली. वाचक क्रमांक :