मयत महिला जयश्री राजेंद्र वाघमारे यांच्या सर्व मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी- बाळूभाऊ लोंढे

By : Polticalface Team ,07-04-2023

मयत महिला जयश्री राजेंद्र वाघमारे यांच्या सर्व मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी- बाळूभाऊ लोंढे पुणे प्रतिनिधी -पिंपरी काळे वाडी येथील जयश्री राजेंद्र वाघमारे वय वर्षे 18.राहाणार बाबासाहेब तापकीर चाळ, तापकीर नगर. काळेवाडी, पुणे या ठिकाणी गेल्या सहा महिन्यां पासून तीच्या सासु, सासरे, दीर व पती यांच्यासोबत राहत होती. परंतु गेल्या सहा महिन्यापासून घरातील सर्व मंडळी तू खालच्या जातीची आहेस म्हणून तिचा सतत छळ करीत होते. व अनेकदा तिला तुझ्या आई-वडींलाकडुन पैसे घेऊन ये अम्हाला घर घ्यायचं आहे म्हणुन पैशासाठी घरातून बाहेर हाकलून देत होते. अशाच अनेक वेळा त्यांनी जयश्री चा मारहाण करून छळ केला होता. त्यानंतर दिनांक 31/03 /2023 रोजी. रात्री साडे दहाच्या दरम्यान घरातील सासू, सासरे, दीर व पती यांनी मिळून जयश्रीचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. आपण जयश्री चे मारेकरी असणाऱ्या सासू-सासरे व दीर यांना देखील तातडीने अटक करून त्यांच्या वरती अॅट्रासिटी अॅक्ट नुसार खुणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी सर्व पक्षीय सर्व संघटना आघाडीच्या व पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने दिनांक 05/04/2023 सांय. कॅन्डल मोर्च्या मुलीच्या राहत्या घरापासून कनैय्या पार्क ते वाकड पोलीस स्टेशन पुणे पर्यंत काढण्यात आला. या मध्ये भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश महामंञी सौ. कोमलताई रमेश शिंदे (लहुकन्या), भारतीय लहुजी शक्ती सेनेचे शंकरराव तडाखे, मातंग युवा संघर्ष समितीचे महासचिव अकाशभाऊ घोलप, समितीचे सल्लागार संदिपभाऊ बरांडे, वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष चंद्रकांतदादा लोंढे, मानवहित लोकशाही पक्षाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष राजुभाऊ धुरंदरे (नेते), मानवहित लोकशाही पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर महिला जिल्हाध्यक्षा सौ.आशाताई पवार, माजी नगरसेविका मनीषाताई पवार, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, देवा भालके, भारत रंधवे, अश्विन खुडे, दिपक साखवे, मनोज तोरमडल, राजु आवळे, संजय ससाणे, यांच्यासह पिडीत कुटुंबातील सदस्य सर्व नातेवाईक व अनेक समाज बांधव मोठया संख्याने उपस्थित होते. मोर्चा समोर पोलीस निरीक्षक यांनी सांगितले की मुलीचा पती अटक असून इतर आरोपीनां, लवकरच अटक केली जाईल सदर आरोपी वर ४९८,३०२, व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं सांगितलं, तरी लवकरात लवकर इतर सर्व आरोपींना अटक करुन कडक कारवाई करावी अन्यथा समाजाच्या वतीने पुणे सिपी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल अशी विनंती वाकड पोलिस स्टेशनचे विशेष पोलीस निरीक्षक सत्यवान माने साहेब यांची भेट घेऊन मातंग युवा संघर्ष (अभियान) समितीचे प्रमुख बाळुभाऊ लोंढे यांनी सकाळी भेट घेऊन चर्चा केली आहे, या मोर्चा मध्ये सर्व दलित संघटना मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष