खामगाव येथील खुन प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई

By : Polticalface Team ,07-04-2023

खामगाव येथील खुन प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०७ एप्रिल २०२३ दौंड तालुक्यातील मौजे खामगाव खुन प्रकरणी दिनांक 01/04/2023 रोजी फिर्यादी कुणाल सदाशिव कवडे वय 38 वर्षे रा खामगाव ता.दौंड जि. पुणे यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की दिनांक 31/03/2023 रोजी सायंकाळी 06:30 वा चे सुमारास इसम नामे पिंटू अशोक गायकवाड, याने आमच्या गोठ्यावरील कामगार नामे 1) मुकेश उर्फ मुक्तार यादव वय 45,रा धरम पूर,उत्तर प्रदेश, याचा कोणत्यातरी अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने वार करून गळा चिरून खून केला आहे तसेच 2) रामकुमार यादव वय 44 वर्षे रा डिग्गी उत्तर प्रदेश याचा कोणत्यातरी अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून यवत पोलीस स्टेशन गु. र.नं. 329/2023 भा. द.वि.क. 302, 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडले पासून सदरचा आरोपी हा फरार झाला होता, त्यामुळे खामगाव परीसरात एकच खळबळ उडाली होती, सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून मा पोलीस अधीक्षक डॉ.अंकित गोयल पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन तत्काळ नुसक्या आवळण्याच्या सूचना केलेने पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकास सूचना दिल्या होत्या. पोलीस पथकानी गुन्हा घडलेल्या परीसरात आसपासचे सीसीटीव्ही तसेच गोपनीय बातमीदार यांच्याकडे चौकशी केली असता माहिती मिळाली की आरोपी नामे पिंटू अशोक गायकवाड, हा रावणगाव,खडकी ता दौंड जि पुणे, या परिसरात दिसून आला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने यवत गुन्हे शोध पथकाने वेशांतर करून सापळा लावून सदर आरोपीस ताब्यात घेत नुसक्या आवडल्या आहेत, सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत, दि,05/04/2023 रोजी आरोपीस अटक करून मा.प्रथवर्ग न्याय दंडाधिकारी दौंड यांच्या समोर हजर करण्यात आले,असता आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, सदरची कामगिरी यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल ,अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली खालील पोलीस पथकाने केली आहे. *पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे* *पोसई प्रशांत मदने* *पोलीस हवालदार निलेश कदम,गुरूनाथ गायकवाड,अक्षय यादव, महेंद्र चांदणे,रामदास जगताप , गणेश कुतवळ* *पोलीस शिपाई मारुती बाराते* यांचे पथकाने केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष