रमजानुल मुबारक - १५, महत्वपूर्ण दिन - शुक्रवार
By : Polticalface Team ,07-04-2023
रमजानुल मुबारक - १५
महत्वपूर्ण दिन - शुक्रवार
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
९२२६४०८०८२
पवित्र रमजान महिन्याने आज मध्यंतर गाठले आहे. आज पंधरा तारखेला रमजान महिन्याचे मध्यंतर पूर्ण होत आहे. आतापर्यंतचे चौदा दिवस कसे निघून गेले ते कळले सुद्धा नाही.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आठवड्याचे सात ही वार खूप महत्त्वपूर्ण आहेत. प्रत्येक धर्माने एखाद्या विशिष्ट वाराला महत्त्व दिले आहे.इस्लाम धर्मामध्ये सुद्धा शुक्रवार म्हणजे जुमा (फ्रायडे) महत्वपूर्ण समजला जातो.शुक्रवारला ईद उल मोमिनीन म्हणजे मोमिनो की ईद का दिन म्हणून संबोधले जाते. इस्लामी इतिहासानुसार जगाच्या संपूर्ण इतिहासामध्ये शुक्रवार या दिवसाला फार महत्त्व आहे. या सृष्टीची निर्मिती शुक्रवारच्या दिवशी झाली.पृथ्वीची निर्मिती शुक्रवारी झाली.धार्मिक दृष्ट्या सर्व ऐतिहासिक घटना शुक्रवारी घडल्या असून या जगाचा शेवट सुद्धा शुक्रवारी होणार आहे म्हणून शुक्रवार हा दिन महत्त्वपूर्ण गणला जातो.
पृथ्वीवरील पहिला मानव असणारे हजरत आदम अलैसलाम ( जे समस्त मानवजातीचे पिताश्री आहेत) हे शुक्रवारीच स्वर्गातून पृथ्वीतलावर पाठवले गेले.याच दिवशी अल्लाहने त्यांची माफी स्विकारली.शुक्रवारीच हजरत नुह अलै सलाम यांची नौका प्रचंड प्रलयानंतर किनारी लागली.शुक्रवारीच हजरत इब्राहीम अलै सलाम नमरुदच्या आगीतून सुखरुप बचावले.हजरत मुसा अलै सलाम फिरऔनच्या जाचातून मुक्त झाले.हजरत युनूस अलै सलाम माशाच्या पोटातून सुखरूप बाहेर आले.अशा खूप घटना सांगता येतील .
या दिवशी साप्ताहिक नमाज (नमाज ए जुमा) म्हणून अदा केली जाते. या दिवशी दुपारी सर्व जण मशिदीमध्ये एकत्र येतात आणि सामूहिक नमाज आदा करतात. रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार सुद्धा जुमातुल विदाअ म्हणून ओळखला जातो.
हिंदू धर्मात श्रावण महिन्यात ज्याप्रमाणे सोमवारला महत्व दिले जाते.ख्रिश्चन धर्मात रविवार (संडे) ला महत्त्व दिले जाते. असे प्रत्येकाचे वेगवेगळे वार निश्चित झालेले आहेत. अल्लाहने ही सृष्टी निर्माण केली त्याचबरोबर सृष्टीचा कारभार पुढे चालवण्यासाठी या सर्व चालीरीती,प्रथा,परंपरा रुढ झाल्या.धर्म वेगळे, पंथ वेगळे,वार वेगळे, पद्धती वेगळ्या असल्या तरी सर्वांचा हेतू हा मानवी कल्याण एवढाच आहे.मानवाच्या कल्याणासाठी सगळ्याच धर्मांनी विविध उपाय सुचविले आहेत. त्याची अंमलबजावणी करताना माणसाने मात्र गफलत केली.त्यातून संपूर्ण जगभरामध्ये धर्म आणि जातीच्या भिंती उभ्या राहिल्या.त्यातून मतभेद निर्माण झाले. वाद विवाद निर्माण झाले आणि मग सदाचाराची जागा तिरस्काराने घेतली.
प्रेषित हजरत पैगंबर साहेबांनी इस्लामची शिकवण देताना इतर कोणत्याही धर्माचा द्वेष करू नका असे सांगितले आहे. म्हणूनच आपण पाहतो की इस्लाम,
मुसलमान आणि त्यांच्या प्रथा याबद्दल सातत्याने कितीही लोक विरोधात बोलत असले तरी मुस्लिम समाजातील कोणीही इतर धर्मियांच्या धार्मिक चालीरीती, प्रार्थना यांना नावे ठेवीत नाही. कारण इस्लामची ती शिकवण नाही. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वार्थीपणा शिरल्यामुळे आपले हेतू साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये राजकारण केले जाते. त्याचा फटका धार्मिक कार्याला सुद्धा बसतो. रमजान महिन्यातील सहेरी आणि इफ्तारची वेळ लोकांना समजावी यासाठी मशिदीतून अजाण दिली जाते.
अजाण देणे म्हणजे लोकांना गोळा करणे नव्हे.फक्त एक माणूस त्याठिकाणी अजाण पुकारतो आणि लोक घराघरातून रोजा इफ्तार करतात.
आजच्या दिवशी विशेष साप्ताहिक प्रार्थना नमाज ए जुमआ ही केली जाते. दुपारी नमाज ची अजान झाल्याबरोबर सर्व व्यवहार बंद करुन नमाजला जावे अशी हजरत पैगंबरांची शिकवण आहे . शुक्रवारी एक क्षण (पल) असा आहे कि या क्षणाला जे काही मागाल,दुआ कराल ती स्विकार केली जाते.पण तो क्षण नेमका कोणता हे अल्लाहने गुप्त ठेवलेले आहे.मात्र तो क्षण दुपारच्या वेळेत आहे असे म्हणतात ( क्रमशः)
-----------------------------------
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.