गॅस पाईपलाईन रस्ते दुरुस्ती निधीला फुटले पाय?

By : Polticalface Team ,08-04-2023

गॅस पाईपलाईन रस्ते दुरुस्ती निधीला फुटले पाय? श्रीगोंदा प्रतिनिधि :- रस्ते दुरुस्ती होण्याअगोदरच निधी खर्च श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीत नैसर्गिक गॅस वाहून नेण्यासाठी 24 इंची स्टील पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून या खोदाईतून होणाऱ्या रस्त्याच्या नुकसान भरपाईपोटी भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड अहमदनगर या गॅस कंपनीने 7 कोटी 33 लाख 33 हजार 73 रुपये श्रीगोंदा नगरपालिकेकडे काही महिन्यापूर्वी जमा केले होते आत्तापर्यंत खोदाईचे 50 टक्के काम पूर्ण झाले असून रस्ते दुरुस्ती निविदा अजून कागदावरच अडकलेली दिसत आहे . दुरुस्तीसाठी पालिकेने एकूण 4 कोटी 40 लाख 83 हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध केले आहेत तब्बल तीन कोटी रुपयांची निविदा काढण्यात आल्या नाहीत मात्र गॅस कंपनीने भरलेल्या नुकसान भरपाई निधीला मात्र पाय फुटलेले आहे दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याअगोदरच यातील पालिकेने 1 कोटी 31 लाख 41 हजार रुपये खर्च केलेले आहे यातील तब्बल 1 कोटी 1 लाख रुपये घनकचरा ठेकेदाराचे बिल अदा करण्यासाठी वापरले आहेत व इतर कामांसाठी तीस लाख रुपये वापरलेले आहेत सदर रक्कम पालिकेने ठराव करून अदा केल्याचे दाखवले असून यामध्ये पंधरावा वित्त आयोग अनुदान प्राप्त झाल्यानंतर घनकचरा ठेकेदाराला अदा केलेली रक्कम पुन्हा नफा फंडात भरण्यात येईल अशी ठरावांमध्ये अट टाकण्यात आली होती मात्र मार्च मध्ये 15 केंद्रीय वित्त आयोग अनुदानाचा पहिला एकूण हप्ता एक कोटी नऊ लाख रुपये श्रीगोंदा नगर परिषदेस वितरित करण्याचा शासन आदेश प्राप्त झाला. मात्र अद्याप पर्यंत घनकचरा ठेकेदाराला दिलेले पैसे रस्ता दुरुस्ती खात्यात वर्ग करण्यात आले नाहीत रस्ते दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने वेगवेगळ्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत यामध्ये खोदाई कामामध्ये पाणी योजनेचे डी आय पाईप दुरुस्तीच्या निवेदला दोनदा प्रसिद्ध करूनही प्रतिसाद मिळाला नाही त्याचे कारण पाणीपुरवठा विभागाने गॅस पाईपलाईन दुरुस्ती निधीतून 21 लाख रुपये खर्च करून दुरुस्तीचे काम पूर्ण केले एकाच कामाच्या दोन निविदा असल्याने व पालिकेच्या विभागांमध्ये समन्वय नसल्याने ठेकेदाराची मात्र चंगळ झाली बायपास रस्त्याने चोवीस इंची गॅस पाईपलाईन नेण्यास मोठा विरोध झाला होता मात्र पालिका प्रशासनाने या विरोधाला न जुमानता बायपासने पाईपलाईन नेण्यास परवानगी दिली होती मात्र आज रोजी गॅस कंपनी द्वारे रस्ते खोदाई चालू असून पालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया फक्त कागदोपत्री चालवली आहे रस्ते दुरुस्त न झाल्या मूळे या मध्ये मात्र नागरिकांनचे हाल होत आहेत कामे पूर्ण होणे अगोदरच नफा फंडातील हा निधी पालिका खर्च करत आहे यामधून गॅस पाईपलाईन दुरुस्ती अंदाजपत्रक हे वाढीव केल्याचे दिसून येत आहे व आज रोजी प्रसिद्ध केलेल्या निविदा तुनही बचत होणार असून हा शिल्लक निधी शहरातील मूलभूत प्रश्नावर खर्च होणे गरजेचे आहे पालिकेचे वीज बिल थकीत असून अनेक दिवसापासून सतरा रस्त्यांना पडलेली खड्डे बुजवण्यासाठी कोणतीही तरतूद नाही नागरिक शहरातील शाळेभोवती व चौकात गतिरोधक बसवण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. महात्मा फुले उद्यान दुरुस्तीसाठी निधी नसल्याचे सांगितले जात आहे असे अनेक लोक उपयोगी कामे होण्याचे बाकी असताना पालिका नफा फंडातून घनकचरा ठेकेदाराचे खिशे भरण्याचे काम चालू आहे पंधरावा केंद्रीय वित्त आयोग याचा निधी उशिरा आला राज्यातील सर्वच पालिकांना तो उपलब्ध नव्हता त्यामुळे घनकचऱ्याची देयक अदा करण्यासाठी सर्वच पालिकांना अडचण होती मात्र रस्ते दुरुस्ती निधी तून निधी उपलब्ध करणे गरजेचे होते का ? याध्ये लाभ कोणाचा आहे असे प्रश्न निर्माण होतात *चौकट* *श्रीगोंदा नगरपालिका डिसाळ कारभारा मुळे रस्ते खोदायच्या निविदा वेळेत निघाल्या नाहीत त्याचा त्रास शहरातील नागरिकांना होत आहे रस्ते दुरुस्ती कामे पूर्ण झाल्यावर शिल्लक निधी चार वर्षां पासून प्रलंबित असणाऱ्या सतरा रस्त्यातील अपूर्ण कामे डिव्हायडर मध्ये माती टाकने या मध्ये झाडे लावणे रंगरंगोटी करणे हे महत्त्वाचे असताना रस्ते दुरुस्ती निधीतून घनकचऱ्याची बिले अदा करणे चुकीचे असून पालिकेचा बेशिस्त कारभार विरोधात जिल्हा अधिकारी कार्यलयात इमेल द्वारे तक्रार दाखल केली आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष