लोणी व्यकनाथ येथील एस बी आयचे एटीएम फोडून ३० लाखाची रोकड लंपास.
By : Polticalface Team ,08-04-2023
श्रीगोंदा :
एसबीआयचे एटीएम फोडून ३० लाखाची रोकड लंपास केल्याने अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अज्ञात तीन चोरट्यांनी एटीएम मध्ये प्रवेश करून तेथील सीसीटीव्ही फोडून एटीएम मशीन गॅस कटरच्या साह्याने कापून त्यातील ३० लाख ६१ हजार दोनशे रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्विसेस मुंबईचे मॅनेजमेंट अधिकारी विश्वास कजबे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ए टी एम फोडल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली घटनास्थळी श्वान पथकाला प्रचारण करण्यात आले. . मढेवडगाव येथील ए टी एम जिलेटीनच्या साह्याने फोडले होते , त्यास काही दिवस उलटतास पुन्हा लोणी व्यंकनाथ येथील एटीएम चोरट्यानी गॅस कटाच्या साह्याने कापले असून आता चोरट्यांनी लाखो रुपये चोरून नेले. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील भारतीय स्टेट बकेचे एटीएम फोडण्याचा चार ते पाच वेळा प्रयत्न झाला होता होता पण नागरिकांच्या सतर्गतेमुळे डाव फसला होता. सायंकाळी चारच्या सुमारास अधिकारी आल्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर अभंग हे करत आहेत .
वाचक क्रमांक :