मुंडेकरवाडी प्रथमच श्री भैरवनाथ महाराजांचा 13 एप्रिल पासून यात्रा उत्सवाचे आयोजन

By : Polticalface Team ,09-04-2023

मुंडेकरवाडी प्रथमच श्री भैरवनाथ महाराजांचा  13 एप्रिल पासून यात्रा उत्सवाचे आयोजन
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लिंपणगाव कार्यक्षेत्रातील मुंढेकरवाडी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सवाचे प्रथमच आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीचे समन्वयक ज्ञानदेव माऊली कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी पत्रकारांना अधिक माहिती देताना यात्रा कमिटीच्या संयोजकांनी म्हटले आहे की, चालू वर्षापासून आम्ही लिंपणगाव कार्यक्षेत्रातील मुंढेकरवाडी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव भरवण्याचा निर्णय घेतला असून, सदर यात्रा उत्सव गुरुवार दिनांक 13 एप्रिल पासून यात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. दोन दिवस हा यात्रा उत्सव सुरू राहणार आहे. यात्रा उत्सवाचे हे पहिलेच वर्ष असून, यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी पाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुंढेकरवाडी, पवारवाडी, शेंडेवाडी, आणि बाबरवाडी येथील ग्रामस्थ व महिला मंडळ ग्रामदैवतला महाभिषेक घालतील. त्यानंतर शेरनी वाटपाचा कार्यक्रम सुरू होईल. सायंकाळी पुन्हा त्याच दिवशी ६ ते ८ मुंढेकरवाडीत महाराजांची पालखी मिरवणूक निघणार आहे. त्याच रात्री सायंकाळी १० ते २ सौ नंदाराणी भोकटे साकुर्डीकर सह संगीतकार दत्ता भोकटे साकुर्डीकर यांचा बहुरंगी लोकनाट्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक 14 एप्रिल रोजी नंदाराणी व दत्ता भोकटे साकुर्डीकर यांचा हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. त्याच दिवशी दुपारी चार वाजता जंगी आखाड्याचे देखील नियोजन करण्यात आले आहे. या मुंढेकरवाडीचा पहिलाच यात्रा उत्सव असल्याने सदर यात्रा कमिटीच्या पंचांना योग्य तो अधिकार देण्यात आलेला आहे. यात्रा उत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व तरुण कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. दरम्यान मुंढेकरवाडी कार्यक्षेत्रातील तरुण कार्यकर्त्यांनी वाडीमध्ये यात्रा उत्सव भरण्यासाठी अनेक वर्षापासून संकल्प केला होता. आता तो पूर्णत्वास जात आहे. दरम्यान मुंढेकर वाडी ही लिंपणगाव कार्यक्षेत्रातील असल्याने यापूर्वी गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचा यात्रा उत्सव सर्व वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थ प्रत्येक महाशिवरात्रीला एकत्र येत यात्रा उत्सव साजरा करत होते. परंतु मुंढेकरवाडीच्या तरुणांनी वाडीतील ग्रामदैवताचा यात्रा उत्सव साजरा करण्यासाठी धाडसाने प्रयत्न केले आहेत. तेव्हा तालुक्यातील भाविक भक्तांनी या यात्रा उत्सवात भेटी देऊन आनंद द्विगुणीत करावा, असे यात्रा कमिटी कडून आव्हान करण्यात येत आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी