१६ एकर जमीन भोगवटा वर्ग २ असताना, भोगवटा वर्ग १ बनावट ७/१२ तयार करून, ९६ लाखांची फसवणूक, प्रकरणी फरार आरोपी अटक

By : Polticalface Team ,09-04-2023

१६ एकर जमीन भोगवटा वर्ग २ असताना, भोगवटा वर्ग १ बनावट ७/१२ तयार करून, ९६ लाखांची फसवणूक, प्रकरणी फरार आरोपी अटक दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०८ एप्रिल २०२३ मौजे खराडेवाडी ता बारामती जिल्हा पुणे येथील जमीन गट नंबर १८९ मधिल १९ एकर ०९ गुंठे जमीनीचे खरेदीखत करून देतो, म्हणून त्या पैकी १६ एकर जमीन ही भोगवटा वर्ग २ असताना देखील, भोगवटा वर्ग १ असा बनावट ७/१२ तयार करून त्या आधारे दौंड तालुका मौजे केडगाव दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत करून, फिर्यादी शिरिष जिजाबा मोहिते, यांची ९६ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची घटना सन २०१७ ते दि, १०/०६/२० रोजी घडल्याने यवत पोलीस स्टेशन येथे फिर्यादीच्या तक्रारी वरून सदर आरोपी विरुद्ध तत्पूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी शिरीष जिजाबा मोहिते वय ५४ वर्ष रा,सी ३/१४/संभाजी नगर धनकवडी पुणे यांनी घडल्या घटनेच्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशन येथे गु र नं, ५९७/२० भा द वि कलम ४०६,४२०,४६८,४७१,१२०,(ब) नुसार,आरोपी १) हरेश हसमुख रांभीया रा गोपाळ कृष्ण हॉटेल शिवाजी चौक दौंड ता दौंड जिल्हा पुणे, २) जितेंद्र मेघराज मुनोत वय ५५, वर्ष रा शिंदी गल्ली स्वाती स्मृती निवास, दौंड ता दौंड जिल्हा पुणे, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तत्कालीन तपासी अधिकारी पी आर मदने पोलीस उपनिरीक्षक यवत पोलीस स्टेशन यांच्याकडे होता, मात्र सदर आरोपी गेली दोन ते अडीच वर्षी पासुन बेपत्ता होते, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या सतर्क कामगिरीच्या माध्यमातून तपासी यंत्रणा फिरवण्यात येताच या प्रकरणातील आरोपी २) जितेंद्र मेघराज मुनोत, वय ५५ वर्ष रा शिंदी गल्ली स्वाती स्मृती निवास दौंड ता दौंड जिल्हा पुणे, या आरोपीला दि,०७/०४/२०२३ रोजी अटक करण्यात येश आले असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ३ दिवसाची कोठडी मिळाली असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली, तसेच आरोपी १) हरेश हसमुख रांभीया, रा गोपाळ कृष्ण हॉटेल शिवाजी चौक दौंड ता दौंड जिल्हा पुणे, हा फरार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सदर प्रकरणातील आरोपी १) हरेष हसमुख रांभीया, २) जितेंद्र मुनोत यांनी फिर्यादी व त्याचा मित्र विलास साहेबराव कामठे यांना मौजे खराडेवाडी ता. बारामती जि. पुणे येथील गट क्रं. १८९ मधील १९ एकर ०९ गुंठे जमीनीचे खरेदीखत करून देतो म्हणुन त्या पैकी १६ एकर क्षेत्र भोगवटा वर्ग २ असताना देखील सदची जमीन भोगवटा वर्ग १ असा बनावट ७/१२ तयार केला व त्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालय केडगाव येथे खरेदी खत करून दिले व ०३ एकर ०९ गुंठे या क्षेत्राचे कुलमुखत्यार पत्र व साठेखत केले परंतु त्याचे खरेदीखत करून न देता तीच जमीन कपटीपणाने व फसवणूक करण्याच्या इरादयाने परत इसम नामे श्री.रोहल दिपक सोनगिरा व श्री. दत्तात्रेय दगडू पाटील यांना दस्त क्रं. ३४९६/२०१८ दि. १०/०७/२०१८ रोजी विक्री करून फिर्यादी व त्याचा मित्र विलास साहेबराव कामठे यांची फसवणूक केली आहे. यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यातील आरोपी मिळुन आला असुन, सध्याचे तपासी अधिकारी PSI Madane पुढील तपास करीत आहेत.
मौजे खराडेवाडी ता बारामती जिल्हा पुणे, येथिल जमीन गट नंबर १८९ मधिल १६ एकर भोगवटा वर्ग २ बनावट ७/१२ प्रकरणी महसुलाचे गाव कामगार तलाठी साहेब यांची व केडगाव दुय्यम निबंधक महत्वाचे दस्तऐवज करणाऱ्या सक्षम व जबाबदार अधिकारी साहेब यांची चौकशी होईल का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.