पुणे सोलापूर हायवे दौंड तालुका मौजे मळद येथे ट्रॅव्हल बस अपघातात एक महिलेचा मृत्यू, तर ४८ प्रवासी किरकोळ जखमी

By : Polticalface Team ,09-04-2023

पुणे सोलापूर हायवे दौंड तालुका मौजे मळद येथे ट्रॅव्हल बस अपघातात एक महिलेचा मृत्यू, तर ४८ प्रवासी किरकोळ जखमी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०९/एप्रिल २०२३,पुणे सोलापूर हायवे रोड दौंड तालुक्यातील मौजे मळद गावच्या हद्दीत भिषण अपघात झाला असुन अधिक प्रवासी जखमी झाले आहेत, काहिंना उपचारासाठी दौंड भिगवण येथिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, सदर घटनेची खबर देत दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी,सुरज अनिल साठे,वय ३४ वर्ष रा भवानी पेठ काशेवाडी ता जिल्हा पुणे, याचे तक्रारी वरून दौंड पोलीस स्टेशन येथे ट्रॅव्हल बस चालकाविरुद्ध गु र नं २६५/ २०२३,भा.द.वि कलम 304 (2),279, 337,338,427,मो.वा.का 184 नुसार ट्रॅव्हल बस चालक आरोपी- चेनाप्पा पिरप्पा यातनूर रा.वारजे माळवाडी,पुणे मुळ रा. कर्नाटक, यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघात दिनांक 08/04/2023 रोजी सकाळी 06.00 वा चु सुमारास मौजे मळद ता.दौंड जि पुणे गावचे हद्दीत घागरे वस्ती येथे सोलापूर पुणे हायवे येथे झाला आहे, फिर्यादी राहत असलेल्या ठिकाणचे स्थानीक लोकांनी एकत्रीत येवून सर्वानी मिळून वर्गनी गोळा करून देवदर्शनाचे नियोजन केले होते. वस्तीमध्ये राहणारे पिंटु पवार यांनी त्यांचे ओळखीची खाजगी ट्रँव्हल्स बस नंबर एम.एच/12/एफ.सी/9055 ही त्यावरील चालक हे नेहमीच देवदर्शनासाठी जात असल्याने व त्यांना संपुर्ण रोडची माहीती असल्याने ठरवली होती. दिनांक 03/04/2023 रोजी वस्तीमधून एकुण 50 लोक देवदर्शनासाठी खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये बसून गेले होते फिर्यादी त्यांचे सोबत जाणे शक्य न झाल्यांने ते दिनांक 05/04/2023 रोजी पुणे येथून रेल्वेने तुळजापुर येथे दिनांक 06/04/2023 रोजी सकाळी 08ः00 वा त्यांचेत देवदर्शनाकरीता जावून सामील झाले होते. दिनांक 07/04/2023 रोजी सांयकाळी 6ः00 वा चे सुमारास तुळजापूर येथून देवीचे दर्शन घेवून पुणे येथे जाण्याकरीता देवदर्शनाकरीता आलेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बस नंबर एम.एच.12/एफ.सी/9055 या मध्ये फिर्यादी मागील बाजूचे सिटवर बसले होते. तुळजापूर वरून गाडी येरमाळा,करमाळा भिगवण मार्गे सोलापूर पुणे हायवे रोडने पुणे बाजुकडे येत असताना ट्रॅव्हल्स बस वरील चालक हा बस जोरात चालवित असल्यामुळे त्यास बस मधील लोक हे गाडी हाळूने चालवा नाही तर गाडी थांबवा आपण थोडया वेळ थांबवून परत निघू असे सांगत होते, परंतू चालक हा माझा नेहमीचा रोड आहे मला संपूर्ण रोडची माहित आहे असे म्हणून गाडी जोरात चालवित होता. त्यावेळी आम्ही मळद ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत दिनांक 08/04/2023 रोजी पहाटे 06ः00 वा चे सुमारास आलो असताना फिर्यादी जागा असताना ट्रॅव्हल्स बस वरील चालक नामे:-चेनाप्पा पिरप्पा यातनूर, हा गाडी चालवित असताना पुढे असलेले तिव्र वळण दिसत असताना देखील त्यांने जाणीव पूर्वक बसचा वेग कमी न करता त्याचे ताब्यातील बस भरधाव वेगात चालवून खड्डयामध्ये ट्रॅव्हल्स बस पलटी करून अपघात केला आहे. सदर बस मध्ये फिर्यादी सोबत वस्ती मधील असलेले प्रवासी.1)उज्जवल दिपक मोरे 2)अश्विनी राजेश कांबळे 3)सिदाध्र्थ संजय पवार 4)नेहा राजेश कांबळे 5)सुजाता युवराज भिसे 6)शर्वरी युवराज भिसे 7)गेशना युवराज भिसे 8)शंकर दिवाकर आडागळे 9)सुमित सुनिल जोगदंड 10)वैभवी सिताराम परदेशी 11)सोहम परशुराम पवार 12)सुनंदा मसा मोरे 13)कमल मुकेश परदेशी 14)अर्चना शंकर अडागळे 15)ज्योती विनोद वंजारे 16)पोर्णिमा संजय पवार 17)बायडाबाई रंगनाथ चव्हाण 18)गिता रवि आखूटे 19) सुजल दिपक गरूड 20)संगिता दिपक मोरे 21) सिधांत संजय पवार 22)कु.दिया दादू अडागळे 23)कु.श्रावणी सुनिल अडागळे 24)शंकर दिनकर अडागळे 25)संजय दत्तूबा यादव 26)दिपाली शिवाजी मोरे 27)कांता सतिश मगर 28) सुरज अनिल साठे 29)कु.वैभवी सिताराम परदेशी 30)चर्तुराबाई विष्णू कसबे 31)सुमित सुनिल जोगदंड 32)आरती शांताराम कांबळे 33)परशुराम पवार 34)शिवानी मोरे 35)शैला लडकत 36) सुनिल अडागळे 37)विशाल ढावरे 38)स्वाती साळवे 39)शारदा अडागळे 40)लक्ष्मी खलुले 41)आशा अडागळे 42)ललीता अडागळे 43)मिरा घोरपडे 44)जयश्री अडागळे 45)कल्पना कराळे 46)आरती संजय पवार 47)संजय पवार 48) गोविंद परदेशी यांना किरकोळ व गंभीर दुखापती झाल्या असल्याने काही जखमी प्रवासींना दौंड येथील पिराॅमीड हाँस्पिटल, व काही जखमी प्रवासींना भिगवण येथील येशोदरा आय.सी.यु. हाँस्पिटल, लाईफ लाईन आय.सी.यु. हाँस्पिटल व भिगवण आय.सी.यु. हाँस्पिटल मध्ये, औषध उपचाराकामी अँडमीट केले असून. त्याधील आरती संजय पवार वय 32 वर्षे भवानी पेठ, काशेवाडी ता.जि.पुणे यांना गळयाला व उजव्या पायाचे गुडघ्याला,डावे हाताचे कोप-याला व दोन्ही पायाचे पंज्याला व गोठयाला किरकोळ व गंभीर दुखापती होवून त्या मयत झाल्या आहेत. ट्रॅव्हल्स बस मधील प्रवाशांचे किरकोळ व गंभीर दुखापतीस तसेच आरती संजय पवार वय 32 वर्षे भवानी पेठ,काशेवाडी ता.जि.पुणे यांचे मृत्यूस ट्रॅव्हल्स बस नंबर एम.एच/12/एफ.सी/9055 हिचे नुकसाणीस कारणीभूत झाला म्हणून फिर्यादीने ट्रॅव्हल्स बस नंबर एम.एच/12/एफ.सी/9055 यावरील चालक चेनाप्पा पिरप्पा यातनूर रा. वारजे माळवाडी,पुणे मुळ रा.कर्नाटक याचे विरूध्द कायदेशिर फिर्याद करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अधिकारी-पो.स.ई/आबनावे अधिकारी -सपोनि/राठोड पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष