श्रीगोंदा प्रतिनिधि :-
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार दिनांक ८ एप्रिल २०२३ रोजी श्रीगोंदा कारखाना परिसरात वास्तव्यास असलेल्या एका महिलेने तिच्या राहत्या घरासमोर असलेल्या किराणा दुकानाच्या बाजुचे शेडमध्ये दारुचे कच्चे रसायन तयार करण्यासाठी लागणारा माल विक्री करण्याकरिता स्वतःचे कब्जात बाळगताना पोलिसांना मिळुन आली आहे.
याबाबत मपोकॉ शितल काळे, नेम. श्रीगोंदा पोलीस स्टेशन, यांनी दीलेल्या फिर्यादी वरून आरोपी महिल कडे ४४,९७५ रु किमतीचा मुद्देमाल त्यात नवसागर, गुळ व यीस्टं मिळुन आल्याने तिच्यावर दारुबंदी अधि कलम ६५ फ प्रमाणे दाखल अमलदार पोना जी डी इंगवले यांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ एम एस बडे, श्रीगोदा पोलीस स्टेशन करीत आहेत.
वाचक क्रमांक :