दौंड मौजे राजेगाव भिमा नदी पात्रात,वाळू माफीयांचा धुमाकूळ, महसुल व पोलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई, ११ लाख १५ हजार किंमतीचा मुद्देमाल तांत्रिक फायबर बोटी नष्ट
By : Polticalface Team ,11-04-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,११ एप्रिल २०२३ दौंड तालुक्यातील मौजे राजेगाव ता दौंड जिल्हा पुणे येथील, भिमा नदी पात्रात अनेक दिवसांपासून वाळू माफियांनी धुमाकूळ घातल, वाळू गौण खनिज तांत्रिक बोटीच्या सहाय्याने उत्खनन करून लुटमारीचा गोरस धंदा जोमात सुरू असल्याची, गुप्त खबर दौंड तहसीलदार यांना मिळाली होती, त्या अनुषंगाने महसूल प्रशासनातील देऊळगाव राजे मंडल अधिकारी लोणकर,व शिक्रापूर गाव कामगार तलाठी दृशंत पाटील, यांना दौंड तहसीलदार मा संजय पाटिल,
यांनी सदर ठिकाणी पोलिसांच्या मदतीने कारवाई चे आदेश दिले होते,
त्या अनुषंगाने फिर्यादी दीपक नवनाथ अजबे,वय ३२ वर्ष व्यावसाय नोकरी,रा ता दौंड जिल्हा पुणे, यांच्या तक्रारीवरून व दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपी १) गोरख मोरे,२) योगेश मोरे ,३)तेजस मोरे, सर्व राहणार खेड तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर, यांच्या विरुद्ध गु र नं,२७०/२०२३, भा द वि कलम ३७९,५११,४३९,३४, नुसार पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 9.15 खान व खनिज अधिनियम 1957 चे कलम 4.21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
दि १०/०४/२०२३ रोजी मौजे राजेगाव येथिल राजेश्वर मंदिराजवळ असलेल्या भीमा नदीच्या पात्रात १) गोरख मोरे, २) योगेश मोरे, ३) तेजस मोरे, सर्व रा खेड ता कर्जत जिल्हा अहमदनगर, हे तिघे तांत्रिक बोटीच्या सहाय्याने अवैद्य बेकायदेशीर वाळू उपसा करीत होते,
दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांची मदत घेऊन, दौंड महसूल विभागाच्या वतीने मौजे राजेगाव येथिल भिमा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली आहे,
हकिकत
समक्ष दौंड पोलीस स्टेशनमध्ये हजर राहुन फिर्यादी जबाब लिहुन देतो की,मी दौंड तहसिल कार्यालय येथे 2020 पासून राजेगावचा गावकामगार तलाठी म्हणून कार्यरत आहे. दि 10/04/2023 रोजी सुमारे दु २:००, वाजेच्या सुमारास, फिर्यादी तसेच मंडल अधिकारी देऊळगाव राजे श्री.लोणकर ,शिरापुर तलाठी श्री.दृष्यंत पाटील असे तहसिल कार्यालय,दौंड येथे उपस्थितीत असताना मा.तहसिलदार साहेबांनी त्यांचे कँबिन मध्ये बोलावून कळविले की गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली,मौजे राजेगाव राजेश्वर मंदिराजवळ असलेल्या भिमानदीच्या पात्रात इसम नामे 1)गोरख मोरे 2)योगेश मोरे 3)तेजस मोरे सर्व रा.खेड ता.कर्जत जि अहमदनगर असे तांत्रिक बोटीच्या साहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा करीत आहेत,
सदर ठिकाणी दौंड पोलिस स्टेशन येथील पोलिस स्टाफ यांची मदत घेवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते, मा.पोलिस निरीक्षक,भाऊसाहेब पाटील यांचे आदेशाने दौंड पोलिस स्टेशन कडील सपोफौ/शिंदे,पो.हवा शेख नेम-स्था.गु.शा,पो.हवा/चव्हाण पो.हवा/बोराडे, पो.हवा/राऊत, पो.काँ/देवकाते, असे सर्व खाजगी वाहनाने बातमी मिळाल्या ठिकाणी दुपारी 3.00 वा.सुमारास राजेगाव राजेश्वर मंदिराजवळ भिमा नदीपात्रात स्पीड बोटच्या सहाय्याने जावून पाहिले असता नदी पात्रात एक फायबर व एक सेक्शन बोटी दिसल्या त्या ठिकाणी गेलो असता वाळू उपसा करणारे इसम नामे 1)गोरख मोरे 2)योगेश मोरे 3)तेजस मोरे सर्व रा.खेड ता.कर्जत जि अहमदनगर या आरोपींनी, भिमा नदी पात्रात पोलीस कर्मचारी व महसूल अधिकारी यांना पाहताच त्यांचे ताब्यातील एक फायबर व एक सेक्शन बोट या नदीपात्रातून नदीच्या कडेला आणून त्यातून पळून जात असताना, पोलीसांनी त्यांना ओळखले, गोरख मोरे, तेजस मोरे, योगेश मोरे, थांबा आम्ही तुम्हाला ओळखले आहे असा आवाज दिला, परंतु सदरचे आरोपी इसम तेथे न थांबता तेथून पळून गेले. त्यांनी सोडून दिलेल्या बोटीचे वर्णन खालील प्रमाणे
3) 8,15,000/-रू किंमतीची एक फायबर बोट त्यामध्ये तीन ब्रास शासकीय वाळू प्रत्येक ब्राँसची अंदाजे किंमत 5,000/रू प्रति ब्रास वाळू
4) 3,00,000/- रू किंमतीची एक सेक्शन बोट जु.वा.कि.अं 11,15,000/- रूपये येणेप्रमाणे वरिल वर्णानाचा किंमतीचा मुद्देमाल वाहुन आणणे शक्य नसल्याने सदरच्या एक सेक्शन बोट व एक फायबर बोट भिमानदी किनारी जिलेटीनच्या साहाय्याने नष्ट केल्या व त्या केलेल्या कारवाईचा सविस्तर पंचनामा आम्ही दुपारी 3.30 वा सुरू करून दुपारी 4.00 वा लिहून पुरा केला आहे. तरी माझी 1)गोरख मोरे 2)योगेश मोरे 3)तेजस मोरे सर्व रा.खेड ता.कर्जत जि अहमदनगर यांच्याविरूध्द दौंड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
दाखल अमंलदार-पो.ना/पानसरे,
अधिकारी-पो.स.ई/गोसावी पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.