कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने सरसकट अनुदान द्यावे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे
, श्रीगोंद्याचे तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
By : Polticalface Team ,11-04-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- कांदा उत्पादक शेतकन्यांना प्रती क्विंटल ३५०/- रुपये अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. परंतु त्यासाठी संबधीत शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक असल्याची अट आहे. परंतु ही अट शिथिल करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे अशा मागणीचे निवेदन नागवडे कारखान्याचे चेअरमन व जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात श्री नागवडे यांनी श्रीगोंद्याचे तहसीलदारांना निवेदन सादर केले असून सदर निवेदनात श्री नागवडे यांनी म्हटले आहे की, श्रीगोंदा तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणांत आहे. परंतु प्रत्येक शेतकऱ्याकडून पिकांची नोंद सात-बारा उतान्यादर केली जात नाही. आजही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ऊस, गहू, हरभरा, भुईमुग, कांदा, डाळिंब, द्राक्ष, लिंबू अशी पिके आहेत. परंतु त्या सर्वांची नोंद सात-बारा उताऱ्यावर नाही. त्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांकडून कांदा पिकाच्या नोंदी करणेचे राहिलेले आहे. तथापि अनेक शेतकऱ्यांनी कांदा पिकाचे उत्पादन घेवून तो कांदा मार्केट कमिटी अथवा खाजगी व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावाने कांदा विक्री केलेला आहे. त्याच्या पावत्या त्यांच्याकडे आहेत. त्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कांदा अनुदान योजनेचा लाभ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. असे सांगून श्री नागवडे यांनी पुढे या निवेदनात आणीखी म्हटले आहे की, ७/१२ उताऱ्यावर नोंद नाही म्हणुन तो शेतकरी अनुदानापासून बाधित राहु नये याकरीता संपूर्ण नगर जिल्ह्यातील सर्व संबंधीत तहसिलदार/ सर्कल /कामगार तलाठी यांना सुचीत करुन सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नोंदी ७/१२ उताऱ्यावर घेवून त्यांना शासनाच्या कांदा अनुदान योजनेचा लाभ मिळवून द्यावा . अशी मागणी या निवेदनात श्री नागवडे यांनी केली आहे. सद्यस्थितीत कांदा उत्पादक कांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, त्यासाठी शासनाने सरसकट अनुदान दिले तर निश्चितपणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळेल, असे देखील नागवडे यांनी म्हटले आहे.
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे, धनसिंग भोईटे, प्रेमराज भोईटे, नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे ,भाऊसाहेब बरकडे, प्रशांत दरेकर, विश्वनाथ गिरमकर, भाऊसाहेब नेटके, हेमंत नलगे, मनोहर पोटे, विलासराव काकडे आदी नागवडे कारखान्याचे आजी-माजी संचालक व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी