रमजानुल मुबारक-२३ *यशस्वी जीवनाचा मार्ग*

By : Polticalface Team ,15-04-2023

रमजानुल मुबारक-२३ 

*यशस्वी जीवनाचा मार्ग*
रमजानुल मुबारक - २३
जे पेराल ते उगवेल
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
९२२६४०८०८२
रमजान महिना आठवडाभरात पूर्णत्वास जाणार आहे.आता प्रत्येक जण उर्वरित दिवसांचा लाभ घेण्यासाठी अगतिक झाला आहे. मशिदींमधून रात्री तरावीहच्या नमाज मध्ये केले जाणाऱ्या कुरआन शरीफचे पठन येत्या काही दिवसात पूर्ण होईल.कुरआन मधील शिकवण ज्यांनी अंगीकारली ते जीवनात व आखेरत मध्ये यशस्वी होतील. जगातील प्रमुख धर्मापैकी दुसऱ्या क्रमांकाचा धर्म म्हणजे इस्लाम.इस्लामने जगाला एका ईश्वराची आराधना करण्याचा संदेश दिला. इस्लामनुसार एका ईश्वराचीच पूजा (प्रार्थना) केली पाहिजे,जो आपल्या सर्वांचा मालिक आहे.त्याला कोणताही रंग,रुप नाही.त्याला कोणी बनवले नाही पण त्याने प्रत्येक वस्तु बनविली. इस्लामी शिकवणीचे प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत - तुमच्या कष्टाच्या कमाईतून अडीच टक्के गरीबांना कोणत्याही परिस्थितीत देणे आवश्यक आहे. तुम्ही लोकांना मदत करा,खुदा तुम्हाला मदत करील.स्वतःसाठी जे पसंत करता तेच ईतरांसाठी करा तरच एक सच्चे मुसलमान बनू शकता. वर्षातून एकदा महिनाभर सकाळपासून सायंकाळपर्यत उपाशी व तहानलेले (प्यासे) रहा म्हणजे तुम्हाला जाणिव होईल कि भूख आणि प्यास काय असते. तुमच्या घरात मुलगी जन्मली तर नाराज होऊ नका.बेटी तर अल्लाहची रहमत (इनाम) आहे. जी व्यक्ति आपल्या कष्टाच्या कमाईतून आपल्या बेटीची परवरिश (पालनपोषन) करून चांगल्या घरी लग्न करुन देईल तो जन्नत मध्ये जाईल. जो स्त्रियांशी चांगले वर्तन (सुलूक) करतो ती सर्वात चांगली व्यक्ति होय. विधवा शापित (मनहूस) नसतात.त्यांनाही चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे म्हणून विधवा आणि त्यांच्या अपत्यांचा स्विकार करा. नमाज पठन करतांना एकमेकांच्या बाजूला बाजू लावून उभे रहा कारण तुम्ही सर्व समान आहात.तुमच्यात कुणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. आपल्या शेजाऱ्यांशी चांगले वर्तन करा,भले ते ओळखीचे असोत अथवा नसोत. दारु आणि जुगार सर्व विनाशाचे मूळ आहे. स्वतःला यापासून दूर ठेवा.मजूराचा घाम सुकण्यापूर्वी त्याची मजूरी आदा करा आणि कधीही कुणी अनाथ किंवा गरिबाची बददुआ ( तळतळाट )घेऊ नका. अन्यथा बरबाद व्हाल. प्रसन्न राहायचे असेल तर श्रीमंताकडे पाहू नका, गरीबांकडे पहा तर खुश रहाल. लोकांशी सद्वर्तन करणे पुण्याचे कार्य आहे. नेहमी नैतिकता आणि सच्चाईच्या मार्गाने चला. नेहमी खरे बोला,दिलेले आश्वासन किंवा केलेले वायदे पूर्ण करा आणि कधीही कुणाचे मन दुखवू नका. आवश्यकता असल्यासच पाण्याचा उपयोग करा,विनाकारण पाण्याचा दुरुपयोग करणे पाप आहे. अनोळखी महिलेवर नजर (दृष्टी) पडल्यास नजर खाली करा कारण महिलांना वाईट नजरेने पाहणे पाप आहे. कुरआन फक्त मुस्लीमांचा धार्मिक ग्रंथ नाही. कुरआन तर केवळ हिन्दुस्थान नव्हे तर जगभरातील मानवांसाठी,प्रत्येक समाजासाठी सद् मार्गावर चालण्याचा आणि उत्कृष्ट जीवन जगण्याचा मार्ग आहे. ईश्वर किंवा अल्लाह हा फक्त मुस्लीमांचा रब नाही तर तो सर्वसृष्टीचा (आलम) आहे म्हणून त्याला रब्बुल आलमीन म्हटले आहे तसेच हजरत पैगंबर हे फक्त मुस्लीमांचे पैगंबर नाही तर सर्वसृष्टीसाठी आहेत म्हणून त्यांना रहमतुलील आलमीन म्हटले आहे. प्रत्येक धर्मातील संत, महात्मे व थोर विभूतींचा आदर व सन्मान करण्याची शिकवण हजरत पैगंबरांनी दिली आहे.चांगले कर्म करा. कारण प्रत्येक कर्माचा हिशोब आपल्याला द्यावयाचा आहे. व्यवहारात सचोटी ठेवा. कर्ज काढून कुणाची फसवणूक करू नका. कर्ज घेतले असेल तर ते फेडण्याची नियत ठेवा.(क्रमशः)

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष