वडगाव निंबाळकर येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचे आयोजन
By : Polticalface Team ,15-04-2023
अमोल गायकवाड वडगाव निंबाळकर
वडगाव निंबाळकर( ता. बारामती) येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वडगाव निंबाळकर येथील सुप्रसिद्ध जादूगार शिवम यांच्या उपस्थितीत कुस्ती लावण्यात आली. यावेळी वडगाव निंबाळकर येथील यात्रा कमिटीचे सदस्य अमित राजेनिंबाळकर पत्रकार अमोल गायकवाड जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र पवार ,बारामती तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र राजेनिंबाळकर,वडगाव निंबाळकरचे माजी सरपंच रवींद्र जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.पंचक्रोशीतील अनेक मल्लांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविलाअसल्याची माहिती वडगाव निंबाळकर येथील यात्रा कमिटीने दिली आहे.कुस्ती हा ग्रामीण भागातील खेळ असून या पुढेही अशा अनेक प्रकारच्या नामांकित कुस्त्या भरवण्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात आले आहे.
वाचक क्रमांक :