काही दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी स्वार्थ साधण्यासाठी कधी बापू तर कधी आमदार पाचपुते यांचा आधार घेतला.
By : Polticalface Team ,15-04-2023
श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात काही वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींनी धुडगूस घालत बनवाबनवी करून गावोगावी दूषित वातावरण करत आहेत. त्यांना वेळीच लगाम घालण्याची नितांत गरज असल्याचे प्रखड मत आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात व्यक्त केले आहे. श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक पार्श्वभूमीवर आमदार बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा येथे विविध संस्था पदाधिकाऱ्यांचा भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते हे होते.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार पाचपुते पुढे म्हणाले की, बाजार समितीची निवडणूक शेवटच्या टप्प्यावर आलेले आहे. बाजार समितीला खरे रूप दाखवण्यासाठी या निवडणुकीत पक्षविरहित आम्ही योग्य चर्चा केलेली आहे. सद्यस्थिताीला राजकारणाची दिशा बदलत असताना वाईट प्रवृत्तींनी चांगल्या संस्थेत राजकारण करत धुडगूस सुरू केलेला आहे. असे सांगून आमदार पाचपुते पुढे म्हणाले की 40 वर्ष आपण राजकारण करत असताना गलिच्छ राजकारण केले नाही. शिवाजीराव नागवडे बापू मी एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो. परंतु तिथेच आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात कायम राहिलो. ती परिस्थिती तालुक्यात राहिलेली नाही. मोकळ्या मनाने आम्ही एकत्र आलेलो असून, कार्यकर्त्यांनी गडबडून जाण्याचे कारण नाही.
राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, आणि मी या निवडणुकीत जो उमेदवार देतील त्याचे प्रामाणिकेपणे काम करावे भरघोस मतांनी उमेदवार निवडून आणावेत निश्चितपणे जिल्ह्यात बाजार समितीचा आदर्शवत असा कारभार करू, मी फुटणार नाही आणि कुणालाही फूटू देणार नाही, अशी शपथ यावेळी प्रत्येक कार्यकर्त्यांना देऊन माफक सल्लादेखील आमदार पाचपुते यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यावेळी म्हणाले की, चांगल्या संस्थेत राजकारण नको, म्हणून आम्ही दोन महिन्यापूर्वी खरेदी-विक्री संघाचे निवडणूक सर्व पक्षांनी एकत्रित बिनविरोध करण्याची संकल्पना मांडली. त्याला सर्वांनीच पाठिंबा दिला परंतु त्या निवडणुकीत देखील दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी गद्दारी केली. आणि आमचे उमेदवार या निवडणुकीत पराभूत केले. त्याच क्षणी आमच्या लक्षात आले तालुक्यातील या दृष्ट प्रवृत्तींना दूर ठेवावे लागेल. असे सांगून श्री भोस पुढे म्हणाले की, शब्दाला तिलांजली देणाऱ्यांबरोबर कोणत्याच निवडणुकीत युती नको. असा संकल्प आम्ही सर्वांनी केला. असे सांगून ते पुढे म्हणाले की आमदार पाचपुते यांच्या बोटाला धरून ज्यांना अनेक पदे मिळाली त्यांनीदेखील आमदार पाचपुते यांचा विश्वासघात केला. यापुढे या दृष्ट प्रवृत्तीच्या हातात बाजार समितीची सूत्रे दिल्यास निश्चितपणे बाजार समितीला टाळे ठोकावे लागतील. त्यामुळे सभासदांनी आमदार पाचपुते, राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा बदला या निवडणुकीच्या माध्यमातून घ्यावा लागणार आहे.
विरोधकांनी देखील आता स्वतःची ताकद या निवडणुकीत दाखवावी अन्यथा आम्ही तरी आमची ताकद दाखवून देऊ असा इशाराही भोस यांनी यावेळी दिला.
यावेळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यावेळी बोलताना म्हणाले की, तालुक्याच्या जडणघडणीत खऱ्या अर्थाने आमदार पाचपुते व शिवाजीराव नागवडे बापू यांनी सर्वसामान्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेतले. आधार देण्याचे काम केले. मात्र काही दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी स्वार्थ साधण्यासाठी कधी बापू तर कधी आमदार पाचपुते यांचा आधार घेऊन तालुक्यात बनवाबनवी चे राजकारण केले. नुकत्याच खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत विश्वासघात करून गलिच्छ राजकारण केल्यामुळे सर्वसामान्य माणूस संतापले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांना अमिष दाखविण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याला कोणीही बळी पडू नये, असे सांगून श्री नागवडे पुढे म्हणाले की तालुक्याचे राजकारण दूषित करण्यासाठी नहाटा यांनी कधी पवार, विखे व आम्हाला फक्त स्वार्थासाठी जवळ केले. त्यामुळे आम्ही वेळीच सावध होऊन सर्वांनी या दृष्ट प्रवृत्तींना बाजूला करण्यासाठी एकत्र आलो आहोत. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी एकसंघ आहोत. प्रत्येकाला गंडा घालणाऱ्या व्यक्तींना या निवडणुकीच्या माध्यमातून दूर करण्यासाठी आम्ही हा एक मताने निर्णय घेतला असल्याचे नागवडे यांनी सांगितले. यावेळी प्रामुख्याने दत्तात्रय पानसरे, बंडोपंत पंधरकर, प्रकाश बोरुडे, श्री कातोरे, पोपटराव खेतमाळीस, रामदास झेंडे, अरुणराव पाचपुते, अॅड. बाळासाहेब काकडे, अॅड. डी डी घोरपडे, भगवानराव पाचपुते आदींनी मनोगत व्यक्त करत विरोधकांचा चांगला समाचार घेतला. उपस्थित कार्यकर्त्यांचे प्रतापसिंह पाचपुते आभार यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.