By : Polticalface Team ,17-04-2023
                           
              दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,१६ एप्रिल २०२३ रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त,डॉ बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्हा यांच्या वतीने दौंड पुरंदर  हवेली या तीनही तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका पत्रकार, सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील तसेच उरुळी कांचन परिसरातील अंगणवाडी सेविका, असे ऐकून साठ हुन अधिक बहुजन समाजातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षित बांधवांच्या कार्याची दखल घेऊन पुणे जिल्हा कार्यकारी समितीच्या वतीने (आदर्श शिक्षक पुरस्कार) तसेच (समाज भूषण पुरस्कार) विचार पीठा वरील अध्यक्ष,  प्रा.रवींद्र चव्हाण, व दौंड तालुका माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ टिपणी पुस्तिका सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले, यामध्ये दौंड तालुक्यातील मौजे बोरिऐंदी गावचे जेष्ठ पत्रकार एम जी शेलार, मौजे यवत गावातील पत्रकार अनिल रघुनाथ गायकवाड, शिक्षक सतिश सावंत सर, नंदादेवी गावचे माजी सरपंच हरिचंद्र राजाराम चव्हाण, यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दि १६ एप्रिल २०२३ रोजी 
कस्तुरी हॉल उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे येथे सत्कार मार्गदर्शन समारंभ कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्यकारणी समितीच्या वतीने करण्यात आले होते, 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.रवींद्र चव्हाण,मा संचालक बार्टी महाराष्ट्र राज्य, तसेच प्रमुख उपस्थिती मा.संचालक अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, दौंड तालुका माजी आमदार मा,रमेश आप्पा थोरात,
यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार व समाज भूषण पुरस्कार देण्यात आले, या वेळी दिपक कांबळे जनरल मॅनेजर युनियन बँक मुंबई, अँड अविनाश जगताप, एवरेस्ट स्पन पाईप इंडस्ट्री, डॉ,बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्हा अध्यक्ष,भिमराव दिवार, एम जी शेलार, उपाध्यक्ष, रा,वि,शिशुपाल सचिव,  विजय दादू रोकडे उपसचिव, कस्तुरी प्रतिष्ठान अध्यक्ष, मिलिंद मेमाणे, माध्यमिक शिक्षण संघ पुणे जिल्हा, उपाध्यक्ष अशोक नाळे, संपत कांचन सामाजिक कार्यकर्ते, विचार पिठावर उपस्थित होते,  पुणे जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष भिमराव धिवार यांच्या हस्ते उपस्थित विचार पीठावरील मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
विचार पीठावरील प्रमुख उपस्थिती दौंड तालुका माजी आमदार रमेश आप्पा थोरात, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा फुले  छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,
१४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त या सत्कार मार्गदर्शन समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील बहुउद्देशीय कार्याचे स्पष्टीकरण करण्यात आले, मा दिपक कांबळे, मा अविनाश जगताप, डॉ प्रकाश पवार,आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात रवींद्र चव्हाण बोलताना म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वी शासकीय व खासगी कर्मचारी मजुर कामगार तत्पूर्वी बारा तास काम करत असे, मात्र संविधानाच्या तरतुदीत आठ तास काम करण्याची तरतूद करण्यात आली महिलांना समान वेतन व संधी उपलब्ध करून देण्यात आली, प्रस्तुती काळात पगारी सुट्टी, महिलांना समान हिस्सा देण्याची घटनेत तरतूद असताना देखील, अनेक बहिण भाऊ न्याय मिळण्याच्या अपेक्षित आहेत, त्यामुळे न्याय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे, पूर्वी राजे महाराजे राणीच्या उदरातून युवराज जन्माला येत असे, मात्र भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून, आपला प्रतिनिधी निवडण्याची संधी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपातून प्रत्येक व्यक्तीला एक मत देण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यात आला.
देशातील व राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून विविध ठिकाणी धरणांची निर्मिती करण्याची तरतूद घटनेत करण्यात आली असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले, तसेच संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान प्रमाणे बहुजनांच्या मस्तकातील दुषित विचार अंधश्रद्धेने खुळखुळा झालेला समाज कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे असा प्रश्न उपस्थित शिक्षित बांधवांना  केला, देश किंवा राज्य चालवणारे प्रस्थापित लोकांन पेक्षा शासकीय पद अधिकारी व कर्मचारी यांच्यावर महत्वाची जबाबदारी असल्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे, जा बहुजनांनो तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला उद्याची शासनकर्ती जमात बनायचं आहे, 
बहुजनांची तरुण पिढी ढोल ताशा बडवत आहेत हि मोठी शोकांतिका असल्याची खंत रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली,  दौंड  पुरंदर  हवेली या तीनही तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका पत्रकार गाव पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्हा सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक समितीचे उपसचिव प्रा, विजय दादू रोकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,या वेळी प्राचार्य वाळुंज सर,मासाळ सर, विकास डोळस राहुल मोरे, यांच्या सह अदी शिक्षक उपस्थित होते, कार्यक्रमाच्या अंतिम प्रसंगी उपस्थित मान्यवरांना उत्कृष्ट स्नेह भोजनदान करण्यात आले.
              
              
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष