शेलगाव (वां) येथे केळी संशोधन केंद्र स्थापन करावे, माजी आमदार नारायण पाटील यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे

By : Polticalface Team ,17-04-2023

शेलगाव (वां) येथे केळी संशोधन केंद्र स्थापन करावे, माजी आमदार नारायण पाटील यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेलगाव (वां) येथे केळी संशोधन केंद्र स्थापन करावे अशी पुर्नमागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली. मागील दोन दिवसांपूर्वी माजी आमदार नारायण पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष मुंबई येथे जाऊन भेट घेतली व करमाळा मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी साकडे घातले.याबाबत सविस्तर माहिती देताना माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील शेलगाव (वां) येथे केळी संशोधन केंद्र निर्माण व्हावे अशी आपण 2018 पासुन मागणी करत आलो आहोत. करमाळा तालूका हा जसा ऊसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो अगदी तसेच मागील काही वर्षांपासून करमाळा तालुक्यातील केळी लागवड व उत्पादन क्षेत्रात वाढ झाली आहे. उजनी बॅकवाटरसह तालुक्यातील पुर्व भागातील शेतकऱ्यांना आता केळी या पिकापासून आर्थिक फायदा मिळू लागला आहे. मागील वर्षापेक्षा यंदा केळीचे क्षेत्र जादा प्रमाणात आहे. सन 2021-22 या वर्षात 6671 हेक्टर क्षेत्र केळी लागवडी खाली आले होते तर यंदा सन 2022-23 या वर्षात यात वाढ होऊन 6978 हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली आहे. यापैकी 3584 हेक्टर ही सुरु म्हणजे चालू केळी असुन 3394 हेक्टरवर खोडवा पिक घेतले जात आहे. केळीचे सरासरी उत्पादक हे प्रति हेक्टरी 69 टन इतके आले. यासाठी केळीच्या विविध जातीची 1 कोटी 32 लाख 75 हजार 136 इतक्या रोपांची लागवड करण्यात आली. तर केळी निर्यातही मोठ्या प्रमाणावर होत असून कंदर येथून 730 कंटेनर म्हणजे 14,600 मे. टन केळी निर्यात केली गेली. तसेच वाशिंबे 520 कंटेनर 10400 मे टन, वरकटणे 1240 कंटेनर 24800 मे टन, जेऊर 710 कंटेनर 14200 मे टन अशी एकूण 3200 कंटेनर मधून 64000 मे टन केळी निर्यात केली गेली. यामुळे करमाळा तालुक्यात केळीचे प्रचंड प्रमाणात उत्पन्न पाहता येथील शेतकऱ्याला या पिकाबाबत अधिक माहिती मिळावी, केळीच्या नवीन जातींवर संशोधन व्हावे, केळीवरील रोग व किडीवर अत्याधुनिक औषधासह उपचार पद्धती शोधून काढता यावी म्हणून एका सुसज्ज केळी संशोधन केंद्राची गरज असुन आपण ही मागणी लावून धरली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक असून लवकरच याबाबत कार्यवाही करु असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. तर करमाळा तालुक्यात सध्या केळी कोल्ड स्टोरेज व पॅक हाऊसची संख्या ही केवळ सहा इतकी असून यात वाढ होण्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांना विशेष अनूदान देण्यात येऊन निधीची तरतूद करण्यात आली यावी अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी केल्याचे व करमाळा तालुक्यातील ऊस आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मा आ पाटील यांचा पाठपुरावा चालू असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.