क्रांतीसुर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्याची संयुक्त जयंती.
By : Polticalface Team ,17-04-2023
अनुशक्ती नगर मानखुर्द मुंबई
14 एप्रिल 2023 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मातंग विकास संघ रजि. मातंग समाज मंदिर येथे उपरोक्त संघटनाद्वारे क्रांतीसुर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्याची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमात संघटनेचे प्रमुख वक्ते म्हणून संस्थापक सुधीर हिवाळे साहेब व मातंग पंचायतन संघाचे संस्थापक मधुकर कांबळे साहेब तसेच क्रांतिवीर लहुजी साळवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद इंगळे साहेब हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद मिसाळ यांना देण्यात आले. तसेच उपस्थित समाज बांधवांना महापुरुषांबद्दल प्रमुख वक्त्याने योग्य असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाला उपस्थित संघटनेचे अध्यक्ष विकासजी चव्हाण व संघटनेचे जनरल सेक्रेटरी कैलास ढावरे संघटनेचे उपाध्यक्ष सतीश जी कांबळे संघटनेचे सहचिटणीस रवींद्र चांदणे सह खजिनदार रितेश जी कसबे व शरद जी वायदंडे संघटनेचे सदस्य
सचिन साठे कमलेश भिसे योगेश चव्हाण प्रकाश डावरे व समाज बांधव उपस्थित होते.
वाचक क्रमांक :