रमजानुल मुबारक - २५ *न्याय तर करावाच लागेल...*

By : Polticalface Team ,17-04-2023

रमजानुल मुबारक - २५

*न्याय तर करावाच लागेल...*
रमजानुल मुबारक - २५
न्याय तर करावाच लागेल...
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
९२२६४०८०८२
पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या चरणातील काही रात्री या लैलतुल कद्र पैकी एक आहेत.त्या शब ए कद्र सुद्धा असू शकतात असे धार्मिक ग्रंथातही म्हटले आहे. तेव्हा या रात्रीत सुद्धा जास्तीत जास्त प्रार्थना, इबादत, अल्लाहचे नामस्मरण करून शक्य होईल तेवढे पुण्य आपल्या नाम ए आमाल मध्ये दर्ज करून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. इस्लाम धर्मामध्ये न्याय म्हणजे इन्साफ ला फार महत्व दिले आहे. जोपर्यंत या जगामध्ये प्रत्येक बाबतीत न्याय केला जात होता तोपर्यंत जगाचा गाडा चांगल्याप्रकारे चालला होता. परंतु जेव्हापासून न्यायदानात अन्याय होऊ लागला,तेव्हापासून जगाची विनाशाकडे वाटचाल सुरू झाली. असे संकेत जगाच्या इतिहासामध्ये पाहायला मिळतात. हजरत पैगंबरांनी प्रत्येक बाबींमध्ये न्याय करा अशी शिकवण दिली आहे.अन्याय करणारांना अल्लाह कधी माफ करीत नाही. जेव्हा मानव जात एकमेकाशी न्याय करीत नाही तेव्हा या सृष्टीचा निर्माता स्वतः न्यायदान करतो. यातूनच भगवान के घर देर है अंधेर नही है असे म्हटले जाते. सचोटी आणि न्याय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेथे सत्य आहे तेथे न्याय आहे. जेथे असत्य आहे तेथे अन्याय आहे.प्रत्येक क्षेत्रामध्ये न्यायदान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. इस्लामचे दुसरे खलिफा आणि हजर पैगंबरांचे एक विश्वासू सहकारी हजरत उमर बिन खत्ताब( रजि अल्लाह तआला अन्हू ) उर्फ हजरत उमर फारूक यांचे व्यक्तिमत्व इस्लामी ईतिहासाचे एक महत्वपूर्ण अंग आहे. जेव्हा हजरत पैगंबरांनी इस्लामची शिकवण लोकांना देण्यास प्रारंभ केला. त्या वेळी मक्कामध्ये जे लोक पैगंबरांचे विरोधी होते, त्यामध्ये हजरत उमर फारूक हे सुद्धा एक होते.त्यांना जेव्हा कळाले कि आपल्या बहिणीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे व ती कुरआन पठण करीत आहे. तेव्हा रागामध्येच तलवार घेऊन ते बहिणीला मारण्यासाठी निघाले.जेव्हा ते बहिणीच्या घरात पोहोचले तेव्हा त्यांची बहीण कुरआन ची तिलावत करीत होती .क्रोधाने तापलेले उमर घरात पोहोचले. बहिणीचा आवाज ऐकून थबकले.कुरआनमधील शब्द कानी पडताच तलवार हातातून गळून पडली.त्या शब्दांमध्ये अशी काही जादू होती कि उमर सुद्धा मुसलमान झाले आणि एकेकाळचे पैगंबरांचे कट्टर विरोधक आता कट्टर अनुयायी बनले. हजरत पैगंबरांना त्यांनी मनापासून साथ दिली.त्यांचा विश्वास संपादन केला.एक न्यायप्रिय व्यक्तिमत्व म्हणून हजरत उमर यांची इतिहासात नोंद झाली आहे. त्यांच्याबद्दल हजरत पैगंबरांनी म्हटलं आहे की माझ्या नंतर जर कोणी प्रेषित असता तर तो उमर असता. यावरून हजरत उमर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येतो. खलिफा म्हणजे बादशहा. दुसरे खलिफा झाल्यानंतर हजरत उमर यांनी इस्लामी राजवटीचा कारभार अत्यंत चांगल्या प्रकारे केला. खूप सुधारणा केल्या. न्यायपालिका निर्माण केली.जनतेच्या हितासाठी स्वतः वेषांतर करून लोकांची खबर गिरी घेत. त्यांच्या गरजा पूर्ण करीत. न्यायदानामध्ये वशिलेबाजी हा प्रकार त्यांनी कधी होऊ दिला नाही.स्वतःच्या मुलाने केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून त्याला इतके कोडे मारले कि तो गतप्राण झाला.पण त्यांनी कधी पश्चाताप व्यक्त नाही केला. न्याय म्हणजे न्याय ही त्यांची धारणा होती. कयामतच्या अनेक लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे न्याय न होणे हे आहे. आज जगात आपण पाहतो न्याय सुद्धा विकला जात आहे. न्यायाधीश विकले जात आहेत. सत्तेच्या दबावापुढे न्यायाऐवजी अन्याय केला जात आहे. लाभाच्या पदासाठी न्याय दिला जात आहे. हे सर्व कयामतचेच लक्षण आहे. न्यायदान करणाऱ्यांनी आपली विश्वासार्हता टिकविणे गरजेचे आहे.हजरत उमर यांच्या राजवटीतील न्यायदानाचे अनेक किस्से इतिहासामध्ये अजरामर झाले आहेत.स्वतःच्याविरुद्ध खटला चालविण्याची परवानगी देणारे ते खलीफा होते .बावीस हजार मैल क्षेत्रफळावर विस्तारलेल्या इस्लामी राजवटीचा हा शासक स्वतः मात्र थिगळं लावलेले कपडे परिधान करीत होता.त्यांनी मनात आणलं असतं तर लाखो रुपयाचा सुट सुद्धा परिधान करू शकले असते.परंतु जनतेचा पैसा स्वतःवर खर्च करायचा नाही हे इस्लामी राजवटीचे तत्व असल्यामुळे या तत्त्वाचे पालन करीत एक वेळ उपाशी राहिले. मात्र बैतुलमाल म्हणजे शाही खजिन्यातून स्वतःसाठी कधी खर्च केला नाही. प्राप्त अधिकाराचा दुरुपयोग कधी केला नाही.उलट ही आपली जबाबदारी असून उद्या कयामतच्या दिवशी आपल्याला खलिफा म्हणून केलेल्या कारभाराचा हिशोब द्यावा लागेल आणि आपण तो देऊ शकतो का या विचाराने रडत असत. कुणावर अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत.शासकीय कामकाजामध्ये कुठेही भ्रष्टाचार होऊ नये यासाठी सक्षम अशी यंत्रणा त्यांनी निर्माण केली. त्यामार्फत आदर्श असा कारभार केला. इस्लामी राजवटीमध्ये त्यांचे योगदान हे अविस्मरणीय आहे. कुरआन शरीफच्या माध्यमातून अल्लाहने आपल्या पैगंबरांमार्फत एक अनमोल मार्गदर्शक असा ग्रंथ आपल्याला दिला आहे. त्यामुळे आपले हे जीवन सार्थकी होण्यासाठी आपण काय केले पाहिजे व कोणत्या गोष्टी पासून दूर राहिले पाहिजे याचे उत्तम आणि सखोल ज्ञान आणि मार्गदर्शन कुरआन शरीफ मध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी त्याचे वारंवार वाचन, पठण करून चिंतन आणि मनन करणे आवश्यक आहे.आपण जितके जास्त त्याचे वाचन करू तितका चांगला अर्थ आपल्याला समजणार आहे व त्या पद्धतीने वर्तन करण्यास आपल्याला सुलभ जाणार आहे. एकमेकाबद्दल वाईट बोलू नका, कोणाचे वाईट चिंतू नका, एखाद्या व्यक्तीच्या काही गोष्टी आपल्याला पटल्या नसतील तर प्रत्यक्ष त्याच्याशी बोला व आपले समज गैरसमज दूर करून घ्या, त्यांच्या चुका त्यांच्या निदर्शनाला आणा आणि जास्तीत जास्त चांगले जीवन जगा असं कुरआन शरीफ मध्ये अल्लाहने म्हटले आहे.कुणालाही दोष देऊ नका. विनाकारण कुणाची हेतुपुरस्सर बदनामी करू नका, त्यामुळे मनं कलुषित होतात.बदनामी हा सर्वात मोठा वाईट गुण आहे त्यापासून अलिप्त राहणे कधीही चांगले. स्वार्थी भावनेने कोणतेही कार्य करू नका समर्पित भावनेने कार्यरत रहा आपल्या प्रत्येक कृत्याचा हिशोब आपल्याला द्यावयाचा आहे हे प्रत्येकाने ध्यानात ठेवावे व त्या प्रमाणे आपले आचरण असावे असेही कुरआनमध्ये म्हटले आहे. कुणाला पाठीमागे वाईट बोलू नका,याला गिबत म्हणतात. हा फार मोठा गुन्हा आहे यापासून दूर राहा अशी ही शिकवण कुरआनमध्ये दिली आहे. व्याजाशी संबंधित देणे-घेणे दोन्हीही हराम आहे. त्यामुळे व्याजाने पैसे देणे बंद करा.नफा कमावताना प्रमाणामध्ये असावा.जास्त नफेखोरी योग्य नाही.बदला घेण्याची भावना मनाशी कधीही बाळगू नका तुम्हाला बदला घेण्याचा अधिकार नाही.प्रत्यक्ष एक आणि मनात एक असं वागू नका. जे पोटात आहे तेच ओठात ठेवा.यातच तुम्हा सर्वांच भलं आहे हे लक्षात ठेवा. दिलेले शब्द पाळा. एखाद्याला जर आपण शब्द दिला असेल तर त्याचे पालन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्याप्रमाणे आपण वागावे अशी शिकवण कुरआन शरीफ मध्ये दिली आहे. समाज जीवनामध्ये वावरताना ज्या काही गोष्टी करणे आवश्यक आहे त्या सर्व चांगल्या गोष्टींची शिकवण इस्लाम धर्माने दिली आहे. जगातील कोणताही धर्म वाईट नाही. जर वाईट काही असेल तर आपण आहोत हे ओळखून प्रत्येकाने आपले जीवन जगावे. (क्रमशः)

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष