सिद्धार्थनगरच्या जिल्हा परिषद शाळेत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

By : Polticalface Team ,18-04-2023

सिद्धार्थनगरच्या जिल्हा परिषद शाळेत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.. दिनांक १८ एप्रिल २०२३,श्रीगोंदा: अनोख्या शैक्षणिक उपक्रमांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेबांची जयंती साजरी होणं म्हणजे समाजाच्या बदलत्या वैचारीक जडणघडणीची चुणूक आहे असे गौरवोद्गार मा. जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी सिद्धार्थनगर जिल्हा परिषद शाळेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरुन बोलताना काढले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनामध्ये पार पडलेल्या या नेत्रदिपक सोहळ्यास माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनदादा पाचपुते, जिल्हा बॅंकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे, रा.कॉं. प्रदेश उपाध्यक्ष घन:श्याम शेलार, नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे, उपनगराध्यक्षा ज्योतीताई खेडकर, पोलिस निरीक्षक भोसले साहेब, नगर पालिका मुख्याधिकारी ढोरजकर साहेब, मा.उपनगराध्यक्ष अशोकराव खेंडके, सतिश मखरे, शहाजी खेतमाळीस, सोनालीताई ह्रदय घोडके, संग्राम घोडके,संतोष कोथंबीरे, प्रशांत गोरे, निसार बेपारी, भागचंद घोडके, जीवाजी घोडके, उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव घोडके, नंदकुमार ससाणे, गोरख घोडके, शिवाजी घोडके, विशाल घोडके, नानासाहेब कोथिंबीरे आदींसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होता. यावेळी मंथन परीक्षेत व चित्रकला परिक्षेत यशस्वी झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मा.बबनदादा पाचपुते, घन:श्याम शेलार, अनुराधाताई नागवडे, शुभांगीताई पोटे यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतील प्रगतीचे विशेष कौतुक केले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या हस्तकला वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन करुन समाधान व्यक्त करत जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. विविध विकासकामांचे भुमिपूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीप मोटे यांनी केले. सुत्रसंचालन शिक्षीका शारदा शेळके यांनी केले तर आभार ह्रदय घोडके यांनी मानले. स्त्रोत:(संदीप मोटे सर)
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.