दौंड कुरकुंभ एमआयडी सी, रासायनिक दुषित पाण्याचा तत्काळ बंदोबस्त करा बैठकीत चर्चा, अन्यथा कार्यवाही आमदार राहुल कुल

By : Polticalface Team ,19-04-2023

दौंड कुरकुंभ एमआयडी सी, रासायनिक दुषित पाण्याचा तत्काळ बंदोबस्त करा बैठकीत चर्चा, अन्यथा कार्यवाही आमदार राहुल कुल दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड तालुक्यातील मौजे कुरकुंभ गावच्या हद्दीतील औद्योगिक वसाहतीतील रासायनिक उद्योगांद्वारे परिसरात होत असलेल्या प्रदूषणाकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, रासायनिक सांडपाण्यामुळे शेतीचे कधिही भरुन न निघणारे नुकसान होत आहे, भूगर्भातील पाण्याचे प्रदूषित स्रोत याबाबत दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी मागील विधानसभा अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करून संबंधित विभागाचे लक्ष वेधले होते, शिक्षणमंत्री ना.दिपकजी केसरकर हे अधिवेशनात पर्यावरण विभागाचा कार्यभार सांभाळत होते, या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ अधिकाऱ्यांची बैठक, दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आज पार पडली, या प्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ अधिकाऱ्यांची बैठकीमध्ये तत्पूर्वी अधिवेशनात घेतलेल्या विषयासंदर्भात कुल यांनी प्रमुख मुद्दे मांडले, रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करता ड्रेनेज द्वारे चेंबरमधुन सरळ दूषित व रासायनिक पाणी बाहेर उघड्यावर सोडण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत, पावसाळ्यामध्ये रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडण्याचे प्रकार सर्रास घडतात याबाबत संबंधित उद्योगांवर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी स्पष्ट भूमिका कुल यांनी घेतली आहे. प्रदूषित रासायनिक सांडपाण्याचा प्रक्रियेसाठी सामूहिक प्रक्रिया केंद्रावर अवलंबून असणाऱ्या उदयोगांचे पाणी वापर व सांडपाणी प्रक्रिया यांचे ऑडिट व्हावे, एमआयडी सी सामूहिक केंद्राद्वारे प्रक्रिया करण्यात येणाऱ्या प्रदूषित रासायनिक सांडपाण्याचे ऑडिट करण्यात यावे. घातक घनकचऱ्याची वाहतूक, विल्हेवाट नियमानुसार होत नसल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे, विद्रावक पदार्थ सॉल्व्हन्ट पुनर्प्रक्रिया, तक घनकचऱ्याची वाहतूक,विल्हेवाट नियमानुसार करण्यात यावी. या भागातील ग्रामपंचायत हद्दीतील कूपनलिका, बोअरवेल व विहिरीतील पाणी प्रदुषित झाल्याचे आढळून आले आहे, एमआयडीसी द्वारे मोफत शुध्द पाणी पुरवठा करण्यात यावा, यापूर्वी जी पाणीपट्टी बिले आकारली आहेत ती रद्द करावी, प्रदूषित रासायनिक सांडपाण्यामुळे बाधित झालेल्या जमिनींचे कृषी विभागा कडून सर्वेक्षण करण्यात यावे, बाधित शेतकऱ्याना नुकसानभरपाई देण्यात यावी, आजू बाजूच्या गावांतील कूपनलिका, बोअरवेल विहिरीतील पाणी प्रदुषित झाल्याचे आढळून आले आहे, कुरकुंभ एमआयडीसी जवळच दौंड शहराला पाणी पुरवठा करणारा पाणी तलाव आहे, तो देखील प्रदूषित होऊन हजारो नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, तलावामधुन पाण्याचे प्रवाह कूपनलिका, विहिरीत नैसर्गिक पाझर झालेल्या पाण्याची चाचणी करण्यात यावी. तसेच कुरकुंभ परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक तपासण्यासाठी यंत्रे बसविण्यात यावीत, सर्व उद्योगांद्वारे परिसरातील ग्रीन कव्हर वाढविण्या साठी वनीकरण सक्तीचे करावे, सदर नियमांचे एमआयडीसी औद्योगिकांनी पालन न करण्याऱ्या उद्योगांवर कडक कार्यवाही करण्यात यावी. अशी स्पष्ट भूमिका घेऊन, सर्व मागण्यां संदर्भात योग्य कार्यवाहीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, सदर बैठकीस महाराष्ट्र प्रदुषण नियामक महामंडळाचे संचालक श्री. व्ही. एम. मोटघरे, पुणे एमआयडीसी चे विभागीय अधिकारी श्री. एस. एल. वाघमारे, पुणे महानगरपालिकेचे श्री. जगदीश खोमणे, श्री. विनीत देशपांडे, श्री. प्रमोद उंडे, पुणे एमआयडीसी चे उपविभागीय अधिकारी श्री. प्रताप जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. संजय काचोळे, दौंड तालुका कृषी अधिकारी श्री. राहुल माने आदी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.