*रमजानुल मुबारक - २६*
*क्या पाया,क्या खोया - विचार करा*
By : Polticalface Team ,19-04-2023
रमजानुल मुबारक - २६
*क्या पाया,क्या खोया - विचार करा*
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
*9226408082*
आज सायंकाळी येणारी रमजानची सत्ताविसावी रात्र ही शब ए कद्र म्हणून सर्वत्र पाळण्यात येते.आज रात्री गेले महिनाभर तरावीह मध्ये पठण करण्यात आलेल्या कुरआन पठणाची सांगता होणार आहे अर्थात कुरआन शरीफचे वाचन,पठन पूर्ण होणार आहे.ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे. गेले महिनाभर प्रत्येकाने तरावीहच्या माध्यमातून कुरआन पठन पूर्ण केले आहे.ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.आता प्रत्यक्ष त्याचे आपल्या जीवनात आचरण करण्याची गरज आहे.
आपल्या जीवनामध्ये प्रत्येक जण विशिष्ट ध्येयापोटी काही ना काही मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो. पद,प्रतिष्ठा,संपत्ती,सेवा यासाठी सतत धडपडत असतो.या सर्व गोष्टी प्राप्त करताना त्यात नशिबाचा देखील मोठा वाटा असतो.नशीब आपल्या हातात नसलं तरी आपल्यासाठी योग्य प्रकारचा निर्णय लावून घेणे हे आपल्या हातात आहे.त्यासाठी सर्वात मोठे हत्यार म्हणजे दुआ मागणे.असं म्हटलं जातं कि दुआ मोमिन का हथियार है.जिथे सर्व मार्ग संपतात,सर्व प्रयत्न अपुरे पडतात, कोणताही वशिला कामी येत नाही,सगळीकडून निराशा हाती येते, त्यावेळी एक प्रभावी हत्यार आपल्याकडे असते,ते म्हणजे दुआ. ज्यावेळी एखादा त्रस्त माणूस अत्यंत वियोगाने सर्व मार्ग बंद झालेले असताना ईश्वराकडे तन्मयतेने दुआ मागतो. त्यावेळी ईश्वर आणि भक्त या दोघांमध्ये कोणीही नसतं.ती दुआ थेट अर्शपर्यंत जाते.ती जर कबूल झाली तर जगातील कोणती ही ताकद तुम्हाला रोखू शकत नाही.म्हणून या दुनियेमध्ये याच्या त्याच्याकडे हात पसरवण्यापेक्षा ईश्वराच्या दरबारामध्ये हात उंच करा,तेथे मागा आणि आपले प्रयत्न सुरू ठेवा. निश्चितपणे आपले इप्सित साध्य होते.
दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाची धावपळ सारखी सुरू असते.तो कधी आराम करीत नाही.सुखाच्या मागे तो धावत असतो. पण हे सर्व करून आपण काय मिळवले याचा तो कधी विचार करीत नाही.एक अपेक्षा पूर्ण झाली की दुसरी अपेक्षा मनात जन्म घेते. मग तिच्या पूर्तीसाठी तो पुन्हा धावपळ करीत असतो.पण हे सर्व व्यर्थ आहे.जे मिळालं ते आपलं आणि जे मिळेल ते ही आपलं.एवढी माफक अपेक्षा ठेवून जर आपण जीवन बसर केले तर नक्कीच मनाचं समाधान झाल्याशिवाय राहत नाही.
रमजान महिन्यातील आज सायंकाळी येणारी रात्र ही सत्ताविसावी शब (रात्र) ही शब ए कद्र म्हणून सर्वत्र साजरी केली जाते.रमजान महिन्यातील शेवटच्या तिसर्या खंडातील सर्व रात्री या लैलतुल कद्र किंवा शब ए कद्र म्हणून गणल्या जातात. या रात्री केलेल्या प्रार्थनेचे मूल्य एक हजार महिन्यांच्या पुण्य प्राप्ती समान आहे. म्हणून शब ए कद्र मध्ये जास्तीत जास्त प्रार्थना केली जाते. शब ए कद्र च्या रात्रीमध्ये कुरआन शरीफचे अवतरण झालेले असल्याने देखील या रात्रींना खूप महत्त्व आहे.रमजान महिन्यातील शेवटच्या दहा दिवसातील विषम तारखा म्हणजे २१, २३,२५,२७,२९ या रात्री पैकी एक रात्र ही शब ए कद्र आहे.प्रत्येक वर्षी जर ही रात्र एखाद्याला प्राप्त झाली तर दहा वर्षात ८३० वर्ष प्रार्थनेचे पुण्य त्याला प्राप्त होऊ शकते.जे कयामतच्या दिवशी त्याला कामी येईल.धार्मिक श्रध्देने शब ए कद्र प्राप्तीसाठी शेवटच्या चरणात सर्वत्र या रात्रीत अनेक जण प्रार्थना करतात आणि शब ए कदर चा शोध घेतात.
रमजान महिन्याचे आता शेवटचे चार दिवस बाकी आहेत.महिनाभर प्रत्येक मुस्लिम घरामध्ये एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे.पहाटे सहरी, तीलावत ए कुरआन, नमाज,इफ्तार अशा पद्धतीने एक धार्मिक वातावरण घराघरातून दिसून येते.हे वातावरण महिनाभरच न राहता वर्षभर कायमस्वरूपी करण्याची आवश्यकता आहे.
रमजान महिन्यामध्ये सर्व प्रकारच्या वाईट कृत्य पासून दूर राहण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करीत असतो. भांडण नाही,शिवीगाळ नाही,वाद विवाद नाही, त्यामुळे एक प्रकारची मानसिक शांतता प्राप्त होते.परंतु पूर्ण वर्षभर सर्वांनीच जर या पद्धतीने वागण्याचे ठरवलं तर निश्चितपणे एक चांगला समाज अस्तित्वात येईल. यासाठी समाजातील सर्वच घटकांनी जे जे चांगले आहे ते स्वीकारावे, त्याचा अंगीकार करावा आणि आपले जीवन समृद्ध आणि संपन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रमजान महिना हा व्यक्तीच्या जीवन प्रशिक्षणाचा काळ म्हणून गणला जातो.या महिन्यात आत्मसात केले जाणारे सर्व गुण पुढील वर्षभर जर आपल्यात टिकून राहिले तर नक्कीच आपण मानसिक, आत्मिक दृष्ट्या देखील सुदृढ राहू शकतो. (क्रमशः)
-------------------------------------
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.