निमगाव खलू आणि ढोकराई फाटा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी आपघात.
By : Polticalface Team ,19-04-2023
श्रीगोंदा प्रतिनिधि :-
१८ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६:३० ते ७:३० वाजण्याच्या सुमारास नगर दौंड रस्त्यावर निमगाव खलू आणि ढोकराई फाटा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांना जागीच आपला जीव गमवावा लागला आहे.
अनिल गुलाब साळवे वय ५० रा. राहींजवाडी ता. श्रीगोंदा आणि तानाजी ज्ञानदेव शिंदे वय ३२ रा. उरुळीकांचन (पुणे) अश्या अपघातात मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत.
काल सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास साळवे हे दुचाकीवरून दळण आणण्यासाठी जात असताना ढोकराई येथे नगरच्या दिशेने चाललेल्या आयषर टेम्पोने त्यांना समोरून जोरदार धडक दिली या अपघातात साळवे यांचा मृत्यू झाला. परंतु ही धडक एवढी जोराची होती की, टेम्पोच्या पुढच्या भंपर मध्ये दुचाकी अडकली ती चालकाने ढोकराई पासून ते लोणी व्यंकनाथ पर्यत तशीच ओढत नेली लोणी या ठिकाणी देखील या टेम्पो चालकाने एका बोलेरो जीप ला धडक दिली. लोणी गावात काही लोकांनी या टेम्पोचालकाला आडवून बेदम चोप देऊन, त्याला पोलिसांच्या हवाली केले.
तर उरुळीकांचन येथील रहिवासी असणारे तानाजी शिंदे हे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना निमगाव खलू नजिक सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली त्यात शिंदे यांचा मृत्यू झाला.
वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली त्यात शिंदे यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी पोहेकॉ मुकेश बडे यांनी भेट दिली. तर सहायक फौजदार विठ्ठल बडे यांनी लोणी व्यंकनाथ येथे जाऊन आयषर टेम्पोच्या चालकाला ताब्यात घेतले.
वाचक क्रमांक :