श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथे साडेतीन लाखांच्या डाळींबाची चोरी, अज्ञात चोरांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,20-04-2023
श्रीगोंदा/ प्रतिनिधी
दि.१८/४/२०२३
श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील ३ लाख ६३ हजार रुपये किमतीचा रुपये किमतीचे सुमारे सहा हजार सहाशे किलो डाळिंब अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. हिरडगाव येथील विष्णू दत्तात्रय बनकर व नामदेव ज्ञानदेव बनकर आणि भीवसेन रोहिदास बनकर यांच्या डाळिंबाच्या बागात जाऊन चोरट्यांनी चोरी केली .याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भिवसेन रोहिदास बनकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दि.१७ एप्रिल रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी आणि विष्णू बनकर व नामदेव बनकर यांच्या हिरडगावाच्या शिवारातील शेतातून सहा हजार सहाशे क्विंटल किलो डाळिंब भगवा रंग असलेले. या डाळिंबांचा मार्केटमध्ये बाजार भाव ५५ रुपये प्रति किलो आहे. यापैकी फिर्यादी यांच्या शेतातील एक लाख ८१ हजार ५०० रुपयांचे तीन हजार तीनशे किलो, विष्णू दत्तात्रय बनकर यांच्या शेतातील १ लाख २१ हजार रुपये किमतीचे दोन हजार दोनशे किलो, आणि नामदेव ज्ञानदेव बनकर यांच्या शेतातील साठ हजार पाचशे रुपये किमतीचे एक हजार शंभर किलो, असे एकूण तीन लाख ६३ हजार रुपये किमतीचे सहा हजार सहाशे किलो डाळिंब चोरट्यांनी चोरी केली आहे. ही घटना मंगळवार, दि.१८ रोजी सकाळी बागेत जाऊन पाहिले असता, झाडाला डाळिंबाची फळे दिसली नाहीत तसेच डाळिंब तोडून पोत्यांमध्ये भरून नेल्याचे लक्षात आले.
पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे दाखल अंमलदार एस एम कुरळे, श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे तपासी अंमलदार गुलाब मोरे हे करीत आहेत
वाचक क्रमांक :